
Ahilyanagar BJP MLA passes away : अहिल्यानगरमधील भाजपचे पैलवान आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी त्यांच्याविषयी आठवणी जागवल्या आहेत.
शिवाजीरावांनी स्वतः करून दिलेली ओळख, युतीत जाण्याचा दिलेला सल्ला आणि विलासराव देशमुख यांच्या महाआघाडीला शिवाजीरावांनी दिलेला सपोर्ट, अशा आठवणींना अजितदादांनी उजाळा दिला. या पैलवानानं जमिनीवर राहून सर्वसामान्यांसाठी केलेलं काम विसरता येणार नाही, असंही अजितदादा शिवाजीरावांच्या आठवणीत म्हटले.
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, "संग्राम जगताप यांनी शिवाजी कर्डिले यांना रुग्णालयात दाखल केले असल्याचे फोनवरून सांगितले. यानंतर मी रुग्णालयातील डॉक्टरांशी देखील फोनवरून बोललो. त्यावेळेस डाॅक्टरांनी सांगितले की, दुर्दैवानं रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला आहे, असं मला सांगितलं."
1995चा काळा असेल त्यावेळेस काँग्रेस (Congress) सरकार गेले होते. त्यावेळेस शिवाजीराव हे पहिल्यांदाच अपक्ष म्हणून निवडून आले होते. पक्षाची मीटिंग सुरू होती. निवडणुका झालेल्या होत्या. त्यावेळेस शिवाजीराव हळूच मागे येऊन बसले होते आणि त्यांनी स्वतःहून आपली ओळख करून दिली होती. अपक्ष कसा निवडून आलो, याची माहिती त्यावेळेस त्यांनी सांगितल्याची आठवण अजितदादांनी सांगितली.
राज्यात युतीला बहुमत असल्याने, त्यावेळेस अजितदादांनी शिवाजीरावांना दिलेल्या सल्ल्याची आठवण सांगितली. ते म्हणाले, "मी त्यांना सांगितलं होतं की, तुम्ही सत्ताधारी पक्षाबरोबर जा, मतदारसंघातील विकास कामाचे मार्गी लावता येतील. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांच्याशी माझे संबंध आले. नंतर पुढे त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून संधी देण्याचा प्रयत्नही केला. पुढे काही राजकीय समीकरणांनसार त्यानुसार ते भाजपबरोबर गेले आणि तिथे ते आमदार झाले."
शिवाजीरावांच्या तब्येतीविषयी अजितदादांनी शिर्डी दौऱ्यात काळजी व्यक्त केली होती. ते सांगताना, "यावेळी निवडून आल्यानंतर त्यांची सातत्याने तब्येत जरा नरमच राहायची. भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शहा हे शिर्डीला आले होते. त्यावेळेस त्यांच्याशी माझी भेट झाली होती. शिवाजीराव तब्येतीकडे लक्ष द्या, चेहरा पांढरा आणि उतरलेला दिसतोय. यावर त्यांनी दादा काळजी घेतोय, उपचार चालू आहेत, असे सांगितले. पण नियतीच्या पुढे आणि काळाच्या पुढे आमचं-तुमचं काही चालत नाही. यंदाच्या दिवाळी सणाच्या पहिल्याच दिवशी ते आपल्याला सोडून गेले."
शिवाजीराव कर्डिले म्हणजे, सगळ्या राजकीय नेत्यांमध्ये मिळून मिसळून राहणारं व्यक्तिमत्व होतं, कामाची पद्धत त्यांची चांगली होती. अलीकडच्या काळात ते जिल्हा बँकेचा कारभार देखील सांभाळत होते, असे सांगून अजितदादांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
'महाआडीचे सरकार असताना विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस सरकार राहणार की, जाणार अशी परिस्थिती होती. त्यावेळेस देखील शिवाजीराव कर्डिले यांनी आम्हाला सपोर्ट केला. आमच्याबरोबर काम करणारा सहकारी आम्ही गमावलेला आहे, हा दुःखाचा डोंगर सावरण्याची ताकद त्यांच्या कुटुंबीयांना मिळो,' अशी श्रद्धांजली अजितदादांनी वाहिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.