Devendra Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP news; शिंदे सरकारच्या यश-अपयशावर भाजप नेत्यांचे होणार मंथन?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह केंद्रातील भाजपचे नेते करणार आगामी निवडणुकांवर नाशिकमध्ये चर्चा.

Sampat Devgire

नाशिक : शिवसेनेत (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे बंड घडवून राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) पायउतार करण्यात आले. त्यानंतर भाजपच्या (BJP) पाठींब्याने सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमुळे राज्यातील जनमानस तसेच राजकीय स्थितीचा आढावा उद्या नाशिकमध्ये (Nashik) घेतला जाईल. भाजपच्या पदरात नक्की काय पडले?. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह केंद्रातील नेते विचारमंथन करणार आहेत. (BJP leaders will brainstorming Political situation In Maharashtra)

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या विविध राजकीय घडामोडी तसेच निवडणुकांत भाजपच्या हाती काय लागले?. भविष्यातील निवडणुकांबाबत काय धोरण असावे याची चर्चा नाशिकमध्ये उद्या (ता.10) पासून होणाऱ्या दोन दिवसांच्या प्रदेश कार्यकारीणीच्या बैठकीत होणार आहे.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक पार पडल्यानंतर त्यात झालेले मंथन, निर्णय व धोरण राज्याच्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. आगामी निवडणुकांसाठी व्युहरचना आखण्यासाठी नाशिकमध्ये प्रदेश कार्यकारीणीची बैठक होत आहे. पक्षाचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांसह केंद्रातील विविध मंत्री त्यात सहभागी होतील, अशी माहिती प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी दिली.

शुक्रवारी (ता.१०) सायंकाळी निमंत्रितांची बैठक होईल. शनिवारी (ता. ११) प्रदेश कार्यकारीणीची बैठक होईल. निमंत्रितांच्या बैठकीसाठी २०० पदाधिकारी तर कार्यकारीणीच्या बैठकीला सातशे पदाधिकारी उपस्थित राहतील. शनिवारी सकाळी दहाला उदघाटन होईल. त्यानंतर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी, दुपारच्या सत्रात राजकीय, कृषी व सहकार याविषयावरील प्रस्तावांवर चर्चा होईल.

धन्यवाद मोदीजी वर भर

यावेळी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल भाजप सरकारच्या अभिनंदनाचा ठराव संमत केला जाईल. सायंकाळी पाचला बैठकीचा समारोप होईल. आगामी निवडणुकांसाठी पुन्हा एकदा मोदी ब्रॅण्ड समोर आणला जाणार असल्याचे बोलले जाते. केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद मानले जाणार आहे.

त्याचबरोबर नवीन संसद भवनचे निर्माण, लोकसभेचा प्रवास, स्वावलंबी भारत, मन की बात, एक भारत श्रेष्ठ भारत, फ्रेण्डस ऑॅफ बीजेपी, एक मंत्री एक दिवस एक विद्यापीठ, नवमतदार नोंदणी, युवा वॉरियर्स, डेटा मॅनेजमेंटचा उपयोग, जी-२० परिषद, आर्थिक विकासाची दिशा, सोशल मिडियाच्या माध्यमातून सरकारच्या योजनांचा प्रसार आदी विषयांवर चर्चा होईल.

यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी महापौर बाळासाहेब सानप, विजय साने, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, सुनील केदार आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT