Dada Bhuse; मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी २७५ उमेदवारांना सरकारी नोकरी!

पालकमंत्री दादा भुसे यांची ताकीद, आई, वडिलांना सांभाळा अन्यथा नोकरी जाईल!
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama

नाशिक : (Nashik) लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली तसा सामान्यांना न्याय द्या. राज्य सरकारी (Maharashtra Government) नोकरी मिळाल्याने कुटुंबाचा सांभाळ करायचा आहे ही अट नियुक्तीपत्रात समाविष्ट आहे याचे भान ठेवा. कालबध्द कार्यक्रम निश्चित करून नियुक्तीपत्र दिली आहेत. त्यामुळे आई, वडिलांचा साभाळ करा अन्यथा नोकरी जाईल, अशी सुचना वजा ताकीद पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिली. (Various Departments 275 Candidates got Appointmen letters today)

Dada Bhuse
NCP News: भुजबळांना 26 महिने तर विरोध करणाऱ्याला 30 महिने शिक्षा!

नाशिकला नियोजन भवन येथे आज अनुकंपा तत्वावर नियुक्ती झालेल्या २७५ उमेदवारांना पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी गंगाधरण डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक शहाजी उमाप उपस्थित होते.

Dada Bhuse
CM Eknath Shinde Birthday News : अशाही शुभेच्छा...मंत्रिमंडळात महिलांना स्थान द्या!

यावेळी पालकमंत्री म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात ७५ हजार युवकांना नियुक्ती देण्याचा निर्णय झाला आहे. याचा जिल्ह्यात आढावा घेतांना अनेक विभागात प्रकरणे प्रलंबित होती असे आढळले. मायेचे छत्र हरवलेल्या कुटुंबातील वारसांना नियुक्तीपत्र देण्यासाठी पाठपुरावा सुरू होता.

ते म्हणाले, ज्यांची नियुक्ती झाली आहे त्यांनी जनसेवेचे साधन म्हणून नोकरीकडे पहावे. हा नाशिक पॅटर्न राज्यात अनुकरणीय ठरेल. दोन महिन्यांत नाशिक जिल्हा शून्य अनुकंपा ठरावा अशी अपेक्षा व्यक्त करीत, त्यांनी अनुकंपा तत्वावर नियुक्तीला विलंब झाला तर मुलाचे वय बाद होते. त्यामुळे अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी सूचना केली.

महिन्यात आणखी दोनशे नोकऱ्या

रोजगार देणे पुण्याचे काम आहे. एका महिन्यात आणखी दोनशे ते तिनशे नियुक्ती पत्र दिली जातील. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, ३६ विभागाचे २७५ प्रलंबित प्रकरणे निकाली काढली आहेत. शासकीय नोकरीत प्रामाणिकपणे कामकाज करावे. सामान्य व गोर गरिबांची कामे करावित.

पोलिस अधीक्षक श्री उमप म्हणाले की, अनुकंपा तत्वावर भरती होते पण त्याचे निश्चित नियोजन नसते. त्यामुळे विलंब होतो. मात्र जिल्ह्यात पालकमंत्र्याच्या पुढाकारामुळे पावणे तीनशे जणांना नियुक्तीपत्र मिळाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com