Dada Bhuse & Rajabhau Waje
Dada Bhuse & Rajabhau Waje Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse News; भुसे आणि राजाभाऊ वाजे भेटले अन् जखमींच्या मदतीला धावले!

Sampat Devgire

नाशिक : (Sinner) शिंदे गटाचे (Eknath Shinde) पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) शिवसेना गटाचे (Shivsena) नेते माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) काल सिन्नरला भेटले. त्यानंतर ते लगेचच अंबरनाथ येथील बस अपघातातील जखमीच्या मदतीला धावले. जवळपास दोन तास त्यांनी विविध रुग्णालयांत जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यानंतर सोबत जेवनही घेतले, मात्र राजकारणावर बोलणे टाळले. (Minister Dada Bhuse & Rajabhau waje avoid politics in sinner visit)

सध्या शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि बंडखोरांचे शिंदे गट यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यामुळे या दोन्ही गटांचे नेते भेटले की कोण प्रवेश करणार याचीच चर्चा होते. सिन्नर येथे पालकमंत्री दादा भुसे आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे येथे एकत्र आले होते. मात्र त्यांनी राजकारणावर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना चांगलेच खडसावले. राजकारण नव्हे तर जखमींच्या मदतीसाठी एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले.

सिन्नर महामार्गावर झालेल्या अपघातात जखमी प्रवाशांची विचारपूस करण्यासाठी गेलेले दादा भुसे यांनी सिन्नरला भेट दिली. यावेळी अंबरनाथ येथील प्रवासी जखमी असल्याने त्यांचा शिवसेनेशी संबंध होता. त्यामुळे श्री. वाजे देखील जखमींवर उफचार सुरु असलेल्या रुग्णालयांत जातीने हजर होते. यावेळी दोन्ही नेत्यांची भेट झाली. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची भेट घेतल्याची भेट घेतली असून जवळपास तासभर चर्चा केली आहे त्यामुळे या तासाभराचे चर्चेत कोणती राजकीय खलबते सुरू होती अशा चर्चांना उधाण आले होते.

पालकमंत्री दादा भुसे यांनी शिंदे येथील सिन्नर येथील ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची भेट घेतली. यावेळी जवळपास तासभर गप्पा देखील झाली. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. ही भेट कशासाठी आणि का असावी, याचे वेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. त्याचबरोबर शिंदे गटाकडून आणखी काही धक्का मिळण्याची शक्यता या निमित्ताने उपस्थित झाल्याची चर्चा घडवीत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले. मात्र उत्तराने पत्रकारांची निराशाच झाली.

सिन्नर अपघातातील जखमींची विचारपूस करून दादा भुसे थेट राजाभाऊ वाजे यांच्याकडे दाखल झाले होते. यावेळी त्यांनी जेवन देखील घेतले.

दादा भुसे म्हणाले...

अंबरनाथ पेंटिंग कंपनीतील शिर्डीच्या दर्शनासाठी 15 बसेस आलेल्या होत्या. यात कामगारांचे कुटुंबीय होते. 15 पैकी 5 व्या क्रमांकांच्या बसचा अपघात झाला असून अत्यंत दुर्दैवि घटना घडली आहे. या अपघाताची मुख्यमंत्री यांनी माहिती घेतली असून ते लक्ष ठेऊन आहे. त्याचबरोबर या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. सिन्नर अपघातातील मृतांच्या कुटुंबीय यांना 5 लाखांची मदत देण्यात येणार असून जखमींना उपचार शासकीय खर्चातून केला जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT