Ajit Pawar News; ...आता अजित पवार देणार तांबेंना शह?

महाविकास आघाडीचा उमेदवार रविवारी ठरण्याची शक्यता, सुत्रांची माहिती.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

नाशिक : नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांनी काँग्रेसचा (Congress) आदेश धुडकावत सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या घडामोडींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आता राज्याचे विरोधी पक्षनेते (NCP) अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीचे धोरण व उमेदवार उद्या (ता.15) ठरण्याची शक्यता आहे. (Mahavikas front will may clear there agenda and candidate on sunday)

Ajit Pawar
Satyajeet Tambe यांनी पाठिंबा मागितलेला नाही, ते आल्यास विषय पार्लमेंटरी बोर्डाकडे जाईल !

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (ता.12) नाट्यमय घडामोडींत काँग्रेसने उमेदवारी दिलेले आमदार डॉ सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यांनी आपले चिरंजीव सत्यजीत तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे गेले तीन दिवस हा मतदारसंघ राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. अद्याप देखील याबाबत गोंधळाचे चित्र आहे.

Ajit Pawar
Congress news; डॉ. सुधीर तांबे यांनी तीन महिने काय केले?

याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल, याबाबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना कल्पना दिली होती. त्यांनी याबाबत काळजीचे कारण नाही, असे कळवले होते, असा खुलासा केला होता. त्यामुळे याबाबत तांबे यांच्या उमेदवारीचा गोंधळ आहे. त्याऐवजी नवा उमेदवार केव्हा जाहीर करणार याची उत्सुकता आहे.

यासंदर्भात कार्यकर्ते व नेत्यांनाही उत्सुकता आहे. तांबे यांची उमेदवारी गेली, ते आजा जवळपास भाजपत गेल्याचे चित्र आहे. त्यांचा नाद सोडा व महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करून प्रचाराला सुरवात करा, अशी भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांत आहे. सध्याची निवडणूक विचारात घेता 54 तालुके आणि पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या मतदारसंघात तांबे यांना अपक्ष म्हणून मतदारांचा पाठींबा मिळवणे सोपे नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट अशा तीन पक्षांचा उमेदवार असल्याने त्याला निश्चितच अनुकुलता असेल. त्याचा लाभ घेऊन उमेदवार जाहीर करण्यासाठी दबाव आहे. त्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते अजित पवार संपर्कात असल्याचे सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com