BSP
BSP sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pune Hit And Run Case : पुण्यातील 'हिट अ‍ॅण्ड रन'प्रकरणात 'बसप'ची मोठी मागणी...

Pradeep Pendhare

Ahmednagar News : पुण्याच्या कल्याणीनगर भागातील 'हिट अ‍ॅण्ड रन' (Pune Hit And Run Case) प्रकरणाचे पडसाद आता नगरमध्ये उमटले आहे. शैक्षणिक संस्कृती असलेल्या पुणे पब संस्कृतीचे केंद्र झाले असून, या प्रकरणातील आरोपींना पाठिशी घालणाऱ्या प्रशासनातील लाचखोर व्यवस्थेवर कठोर कारवाईची मागणी बहुजन समाज पक्षाने केली आहे.

पुण्यातील हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण (Pune Hit And Run Case) राज्यभर गाजत आहे. या प्रकरणात वेगवेगळे मुद्दे पुढे आलेत. वाहनाचा चालक बदलण्यापासून ते कार चालवणारा आरोपीच्या रक्त नमुने बदलण्याचा प्रकार या प्रकरणात झाला आहे. पुण्यातील जागरूक लोकांनी समाज माध्यमातून या घटनेबाबत दबाव निर्माण केला. यानंतर प्रशासकीय व्यवस्थेवर दबाव वाढला. घटनेत अनेक ठिकाणी प्रशासकीय व्यवस्था मॅनेज झाल्याचे समोर आले. याची कबुली खुद्द पुणे पोलिस (Pune Police) आयुक्तांनी दिली. याप्रकाराचे आता पडसाद राज्यभर उमटू लागले आहे. पुण्यातील या घटनेत कठोर कारवाई व्हावी, यासाठी बसपने (BSP) नगर जिल्हा प्रशासन आणि पोलिस अधीक्षकांना निवेदन देत राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बसपचे (BSP) जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, प्रभारी सुनील ओव्हळ, उपाध्यक्ष शहानवाज शेख, शहराध्यक्ष फिरोज शेख यांनी पुणे हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेवर कारवाईची मागणी केली.

दरम्यान, कोपरगाव येथील युवक अमीर मोहमंद पठाण याला काही टोळक्याने मारहाण केली आहे. यात हा युवक गंभीर जखमी झाला असून, हल्ला करणारे टोळके गुन्हा दाखल होऊन खुलेआम फिरत आहे. या टोळक्याला तातडीने अटक करावी, अशी देखील मागणी बसपने पोलिस अधीक्षकांकडे केली. BSP statement to city police superintendent in Pune hit and run case

...तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

नगर शहरातील अन्न सुरक्षा योजनेच्या अनेक लाभार्थींना रेशनिंगचे धान्य दिले जात नाही. रेशनिंग दुकानदार सर्वसामान्य नागरिकांशी मुजोरीची भाषा करतो. अन्न-धान्य वितरीत करण्याबाबत उडवाउडवीची उत्तरे देतो. अल्पसंख्याक लाभार्थींना हक्काच्या अन्न-धान्यापासून वंचित ठेवले जात आहे. अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थींना अन्न-धान्याचा लाभ मिळण्यासाठी सहा जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा बसपने दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT