Ram Shinde and Rohit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shinde Vs Pawar: जामखेड बाजार समितीत दैव राम शिंदेंच्या बाजूने; ईश्‍वर चिठ्ठीतून सभापती भाजपचा तर उपसभापती राष्ट्रवादीचा

Jamkhed Bazar Samiti: जामखेड बाजार समितीच्या सभापतीपदासाठी हाय व्होल्टेज घडामोडी

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar News: राज्यात सर्वात जास्त चर्चेत राहिलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदी कुणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज जामखेड बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाची निवड पार पडली.

या निवडीमध्येही दोन्ही गटाला समसमान मते मिळाली. त्यानंतर सभापती आणि उपसभापती पदासाठी ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये सभापतीपद आमदार राम शिंदे यांच्या गटाकडे गेले. तर उसभापतीपद हे आमदार रोहित पवार यांच्या गटाकडे गेले.

जामखेड बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे शरद कार्ले यांची निवड झाली. तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे कैलास वराट यांची निवड झाली आहे. जामखेड बाजार समितीच्या सभापतीपदासाठी हाय व्होल्टेज घडामोडी घडल्या.

दरम्यान, जामखेड बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या गटाला समसमान 9-9 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सभापती आपल्याच गटाचा व्हावा, यासाठी आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागली होती.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT