Satara Police News : कोयनानगरच्या पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या जागेस मुख्यमंत्र्यांची मान्यता

Koyananagar News आपत्ती परिस्थिती बचाव कार्याचे प्रशिक्षण पोलीस बांधवांना देण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली जाणार आहे.
Shambhuraj Desai, Eknath Shinde
Shambhuraj Desai, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Koyananagar Police News : सातारा जिल्ह्यातील गोकुळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथे राज्य आपत्ती बचाव पथक युनिट अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला आहे. या केंद्राच्या स्थापनेसाठी एकूण ३८.९३ हेक्टर आर जागा सातारा जिल्हा पोलीस दलाला Satara Police उपलब्ध करुन देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली.

शासनातर्फे विविध आपत्तीप्रसंगी बचाव कार्य करण्यासाठी राज्य आपत्ती बचाव दलाची स्थापना करण्यात आली आहे. या युनिटअंतर्गत आपत्ती परिस्थिती बचाव कार्याचे प्रशिक्षण पोलीस बांधवांना देण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली जाणार आहे.

यासाठी सातारा जिल्ह्याच्या पाटण Patan तालुक्यातील गोकुळ तर्फ हेळवाक (कोयानानगर) येथे कोयना नदीच्या काठावर एकूण ३८.९३ हेक्टर आर जागा उपलब्ध करुन देण्यास मुख्यमंत्र्यांनी CM Eknath Shinde मान्यता दिली. या प्रशिक्षण केंद्रामुळे राज्याला हक्काचे आपत्ती बचावाचे प्रशिक्षण देणाऱ्या केंद्र उपलब्ध होणार आहे.

Shambhuraj Desai, Eknath Shinde
Akola BJP News : अंधारेंच्या नावावर एकमत, पण अग्रवालांच्या नावाला विरोध करणारे ते दोन डॉक्टर कोण?

नैसर्गिक आपत्तीत प्रामुख्याने पुर परिस्थिती हाताळण्याच्या प्रशिक्षण याठिकाणी देणे शक्य होणार आहे. तसेच या केंद्रामुळे पाटण तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. राज्य आपत्ती बचाव दलाकरिता आणि प्रस्तावित पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी अशी एकूण २६४ पदांसाठी २७१.४१ कोटी रुपयांच्या खर्चास देखील यावेळी मान्यता देण्यात आली.

Shambhuraj Desai, Eknath Shinde
Pune News: "'मविआ' सरकार घालवण्यासाठी घरी बसायलाही तयार होतो; पण पक्षाने मला सन्मानित करून उपमुख्यमंत्री केलं"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com