Eknath Shinde-Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Politics : भाजपला शिंदेंनी जिवंत केलं... शिवसेना आमदाराच्या वक्तव्यांनी महायुती घायाळ, फडणवीसांबद्दलही मोठा गौप्यस्फोट

Chandrakant Raghuvanshi On BJP Devendra Fadnavis : शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या वक्तव्याने महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. भाजपला एकनाथ शिंदेंनी जिवंत केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra political news : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच या वृत्ताचे खंडन करुन आपण कुठेही जाणार नसून महाराष्ट्रात राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पण महायुतीमधील शिवसेना पक्षाच्या आमदाराच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या वक्तव्याने महायुती घायाळ झाली आहे. काल त्यांनी एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्याने राज्यात भाजप जिवंत झाला, असे विधान केले होते. तर आता मुख्यमंत्री फडणवीस हे लवकरच दिल्लीत जाणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

भारतीय जनता पक्षाला जिवंतच एकनाथ शिंदे यांनी करुन दिलं. राज्यात भारतीय जनता पक्षाचे अस्तित्वच राहिलं नव्हतं. महाविकास आघाडी सत्तेत होती. एकनाथ शिंदेंनी उठाव केल्यावरच भाजप सत्तेत आल्याचा दावा रघुवंशी यांनी केला.

आता नंदूरबार येथे माध्यमांशी बोलताना आमदार रघुवंशी यांनी पुन्हा एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुती सुमने उधळली आहेत. राज्याची धुरा पात्र आणि योग्यपणे सांभाळणार कोण असेल तर एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांच्या कार्यकाळात लोकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवल्याचे ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याची माहिती मिळत आहे असा गौप्यस्फोटही रघुवंशी यांनी केला आहे. महाराष्ट्राचे नेतृत्वसुद्धा केंद्रात पाहिजे म्हणून देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर मग राज्याची धुरा कोण सांभाळेल. तर त्यासाठी पात्र आणि योग्य एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी अपेक्षा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केली.

गावितांवर निशाणा

चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजप नेते विजयकुमार गावितांच्या मंत्रिपदावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्यामुळेच डॉ. विजयकुमार गावित यांनाही मंत्रिपद मिळालं आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच डॉ. विजयकुमार गावित यांची लॉटरी लागली. गावितसाहेब अडीच वर्षे आदिवासी विकास मंत्री राहिले आहेत, असं म्हणत रघुवंशी यांनी गावितांवर निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT