Nashik Drought : दुष्काळी यादीत नाव नाही, शेतकऱ्यांची नाराजी; नाशिकच्या चार तालुक्यांची पुन्हा पाहणी होणार

Nashik farmers demand drought relief :संकटाचा काळ असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही अशी ग्वाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. दुष्काळी यादीत समावेश नसलेल्या चार तालुक्यांची पुन्हा पाहणी करण्याचे आदेश त्यांनी दिले.
Nashik drought affected villages list
Nashik District Collector Ayush PrasadSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik drought affected farmers: पावसाने दडी दिल्याने राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील दहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश करण्यात आला आहे.

परंतु दुष्काळी यादीतून वगळण्यात आल्याने उर्वरित चार तालुक्यांतील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून आमच्याही तालुक्यांचा समावेश दुष्काळी यादीत करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दुष्काळी यादीत समावेशासाठी चारही तालुक्यांतील शेतकऱ्यांकडून होत असलेली मागणी लक्षात घेता, दुष्काळी यादीत समावेश नसलेल्या चांदवड, निफाड, त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी या चार तालुक्यांची पुन्हा पाहणी होणार आहे.

परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यंत्रणांना दिले आहेत. संकटाचा काळ असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रसाद बोलत होते. ते म्हणाले, की २०१७ च्या निकषांनुसार दुष्काळी तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, संबंधित तालुक्यांतील परिस्थिती आणि शेतकऱ्यांची भावना लक्षात घेऊन प्रत्यक्ष जागेवर जाऊन वस्तुस्थिती तपासण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अहवाल सादर केला जाईल.

Nashik drought affected villages list
Nashik DCC Bank : नाशिक जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत गदारोळ : मंत्री झिरवाळांच्या समोरच सभासदांचा संताप, प्रशासकांची गाडी अडवली

नुकसानग्रस्त क्षेत्रातील पंचनामे सुरू असून स्थानिक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रशासन ठामपणे उभे असून शासनाच्या दुष्काळासंदर्भातील आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पीक पाहणीची नोंद करा

जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांनी पीक पाहणीची नोंद केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनीही तत्काळ पीक पाहणीची नोंद करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. पीक पाहणीची अचूक नोंद उपलब्ध झाल्यामुळे शासनाच्या विविध मदत व नुकसानभरपाईच्या प्रक्रियेसाठी आवश्यक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

Nashik drought affected villages list
Nashik drought news : नाशिक जिल्ह्याला मोठा दिलासा! 15 पैकी 10 तालुके दुष्काळाच्या यादीत; पाहा कोणते?

ऍग्रोस्टॅक नोंदणी

तसेच शेतकऱ्यांनी ऍग्रोस्टॅक नोंदणी, फार्मर आयडी आणि सात-बारा उतारा यासंबंधी आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी. सात-बारा उताऱ्यामध्ये काही त्रुटी असल्यास त्यामध्ये दुरुस्ती करून घेण्याची संधी उपलब्ध आहे. संबंधित शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही प्रशासनाने आवाहन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com