Chandrakant Raghuvanshi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chandrakant Raghuvanshi BJP : ‘भाजपचे लोक लग्नातही कमळाचा बिल्ला लावतात’; शिंदे शिलेदाराचा जिव्हारी लागेल, असा खोचक टोला

Eknath Shinde Shive Sena MLA Chandrakant Raghuvanshi takes a sharp jibe at BJP workers over the lotus badge culture : चंद्रकांत रघुवंशींच्या वक्तव्याने महायुतीतील भाजप-शिंदे शिवसेनेच्या अंतर्गत धुसफुशीची पुन्हा चर्चा; ‘शिवसेना कार्यकर्त्यांनीही धनुष्यबाणाचे बिल्ले लावावेत’

Pradeep Pendhare

BJP Vs Eknath Shinde Shiv Sena : सत्ताधारी महायुतीमधील भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेत वरकरणी छान वाटत असले, तरी कुछ भी अलबेल नही है, असे वातावरण आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नंदुरबारचे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या मित्रपक्ष भाजपला खोचक टोला लगावला आहे. याचबरोबर आपल्या पक्षातील नेते, कार्यकर्ते यांना देखील सल्ला दिला आहे.

शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी हे आपल्या बेधडक विधानांमुळे चर्चेत असतात. आता त्यांनी आपला मित्रपक्ष भाजपला (BJP) खोचक टोला लगावला आहे. भाजपचे लोक लग्नातही कमळाचा बिल्ला लावून जातात, त्यांना वाटतं बिल्ला लावला की, चांगलं जेवण मिळेल, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

आमचे मित्र पक्ष भाजपचे कार्यकर्ते, नेते, आमदार, मंत्री मंत्रालयात सुद्धा कमळाचे बिल्ले लावून फिरतात. माझी इच्छा आहे की, शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेचे धनुष्यबाणाचे बिल्ले लावून फिरले पाहिजे. आमदार रघुवंशी यांच्या बेधडक विधानामुळे महायुतीत भाजप-एकनाथ शिंदे शिवसेनेचे अलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

महायुतीद्वारे सत्तेत एकत्र असूनही अंतर्गत धुसफूस थांबण्याचे नाव घेत नसल्याचे हे चिन्हं आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार रघुवंशी यांनी थेट भाजप कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे.

भाजपच्या आक्रमक प्रचारावर आणि कार्यकर्त्यांच्या बिल्ला संस्कृतीवर टोला लगावताना, त्यांनी थेट लग्नाच्या पंगतीतील उदाहरण दिल्याने शिवसेनेचा हा वार भाजपच्या जिव्हारी लागला नसेल, असे होणार नाही. भाजपचे नेते रघुवंशी यांच्या या बेधडक विधानाला काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT