Tiranga Rally at Nandurbar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde politics: शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने तिरंगा रॅलीतून मारले एका दगडात दोन पक्षी, विरोधकांनाही दिला संदेश!

Chandrakant Raghuvanshi; Shiv Sena Eknath Shinde party's tricolor rally in Nandurbar to honor Indian soldiers -शिवसेना शिंदे पक्षाच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या समर्थनार्थ काढलेल्या तिरंगा रॅलीला युवकांची लक्षणीय उपस्थितीची ठरली चर्चेचा विषय

Sampat Devgire

Shivsena Shinde news: भारतीय सैन्याने राबविलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'चे नंदुरबार मध्ये स्वागत करण्यात आले. भारतीय सैन्याला पाठिंबा म्हणून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने तिरंगा रॅली काढली. या रॅलीत पक्षाने केलेले शक्ती प्रदर्शन चर्चेचा विषय आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार येथे तिरंगा रॅली काढली. या रॅलीत मोठ्या संख्येने युवकांनी नागरिक सहभागी झाले होते. शहरात मोटर सायकल रॅली काढून पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी थेट पाकिस्तानला इशारा देण्यात आला.

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबविले. दहशतवाद्यांची पाळीमुळे खोदून काढली. पाकिस्तानी सैन्याचे मनसुबे उधळून लावले. अनेकांच्या या शौर्यामुळे देश वाशी यांचा उर भरून आला आहे. भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ आणि त्यांचे मनोबल उंचावे म्हणून सर्व भारतीय नागरिक देशभर उपक्रम राबवित आहेत. त्याचे अनुकरण शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने नंदुरबारमध्ये केले.

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशभर दहशतवादी आणि पाकिस्तान विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले. त्याचा निषेध म्हणून देशभर विविध पक्षांनी तिरंगा रॅली काढून भारतीय लष्कराला पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार येथे रॅली काढण्यात आली.

अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत शिवसेना शिंदे पक्षाने काढलेली रॅली चर्चेचा विषय ठरली. त्याचे कार्यकर्ते आणि पाठीराखे यांचं मोठ्या संख्येने नागरिक या रॅलीत तिरंगी ध्वज घेऊन सहभागी झाले होते. शहरात अन्य राजकीय पक्ष आणि संघटनांनी रॅली काढली होती. शिवसेना शिंदे पक्षाच्या रॅलीला मात्र मोठा प्रतिसाद मिळाला.

सध्या नंदुरबारमध्ये भाजपचे माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यात जोरदार राजकीय रस्सीखेच सुरू आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नंदुरबार नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने दोन्ही पक्ष सक्रिय झाले आहेत. त्या दृष्टीने तिरंगी रॅली हा विषय राजकीय दृष्टीने पाहिला जात आहे. यामध्ये शिवसेना शिंदे पक्ष शक्ती प्रदर्शनात उजवा ठरल्याची चर्चा आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT