Dhule Cash Controversy: संजय राऊत यांनी फोडला बॉम्ब, ‘अर्जुन खोतकरांसाठी १५ कोटी जमा होणार होते’

15 Crore Deal Allegation: विधीमंडळ अंदाज समितीचे प्रमुख आमदार अर्जुन खोतकर प्रकरण यांच्या विरोधात ‘ईडी’ची केस बनते, कारवाई झाली पाहिजे.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News: धुळे विश्रामगृहावर विधिमंडळ अंदाज समितीच्या दौऱ्यात पाच कोटी रुपये आढळले. यासंदर्भात शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी एन्ट्री केली आहे. सकाळी त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षावर आरोपांचा मोठा बॉम्ब फोडला. यामध्ये शिवसेना शिंदे पक्षाची कोंडी झाल्याचे चित्र आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार आणि विधिमंडळ अंदाज समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर धुळे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या खोलीमध्ये पाच कोटी रुपये आढळले. बाबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अनिल गोटे यांनी हा प्रकार उघडकीस आणला. त्यामुळे राज्यभर एकच खळबळ उडाली आहे.

आता या प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते आमदार अर्जुन खोतकर यांच्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून पैसे जमा केले जात होते. यासाठी एकंदर पंधरा कोटी रुपये जमा होणार होते, असा गंभीर आरोप केला. या आरोपांमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Sanjay Raut
Cash Controversy : एकनाथ शिंदेंच्या आमदाराच्या पीएच्या खोलीत सापडले पैशांचे घबाड, अनिल गोटेंकडून वस्त्रहरण!

गेल्या तीन दिवसांपासून आमदार खोतकर यांच्यासाठी पैसे जमा करण्याचे काम कंत्राटदार करीत होते. येत्या दोन दिवसात आणखी दहा कोटी रुपये जमा केले जाणार होते. सर्व पैसे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनाच दिले जाणार होते याबाबत कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही.

Sanjay Raut
Ahilyanagar gram panchayat notice : 378 ग्रामपंचायत सदस्यांना अपात्रतेचा धक्का बसणार; जिल्हाधिकारी कार्यालयानं बजावल्या नोटीसा

हे प्रकरण `ईडी`चे आहे. पैशांचा गैरव्यवहार स्पष्टपणे जाणवत आहे. याबाबत आम्हीदेखील तक्रार करणार आहोत. यंत्रणेने त्याची दखल घेऊन आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी खासदार राऊत यांनी केली.

आमदार खोतकर हे पूर्वी आमच्याकडेच (उध्दव ठाकरे)होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे निष्ठेच्या अनाभाका घेऊन शेवटी ते गद्दारांच्या टोळीत सामील झाले आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात सध्या ते आहेत. त्यामुळे या पैशांचे काय होणार होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असे देखील खासदार राऊत म्हणाले.

धुळे विश्रामगृहाच्या कक्ष क्रमांक १०२ मध्ये सापडलेले पैसे आणि घबाड मोजण्याचे काम अद्यापही सुरूच आहे. पैसे आमदार खोतकर यांच्यासाठी होते. हे सांगण्यासाठी ब्रह्मदेवाने येऊन सांगण्याची गरज नाही. यंत्रणेला ते स्पष्टपणे दिसते आहे, आता प्रशासनाची जबाबदारी असून त्यांनी आमदार खोतकर यांच्या विरोधात कारवाई करावी.

खासदार राऊत यांनी महायुती सरकारवरही गंभीर आरोप केले. सध्याचे सरकार हे भ्रष्टाचाराच्या दलदलीतून तयार झाले आहे. हे सरकार या भ्रष्टाचाराच्या दलदलीतच गाडले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या राज्यात महाराष्ट्राची ही अवस्था झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com