Chandrashekhar Ghule, Monika Rajale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chandrashekhar Ghule : चंद्रशेखर घुलेंनी ठोकला विधानसभेसाठी शड्डू; म्हणाले, 'परिवर्तनासाठी...'

Youth Transformation Meeting : राजकीय भूमिका गुलदस्त्यात असलेले युवक परिवर्तन मेळाव्यानिमित्ताने सक्रिय.

Pradeep Pendhare

Chandrashekhar Ghule : राज्यात राजकीय घडोमोडींत शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये फूट पडली. याचा परिणाम दोन्ही पक्षांशी निगडित असलेल्या राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर झाला. यात कोण कुठे? हा प्रश्न असताना अनेकांनी आपली भूमिका आजही गुलदस्त्यातच ठेवली आहे. यात शेवगाव - पाथर्डी मतदारसंघातील माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचेही असेच होते.

परंतु, त्यांनी युवक परिवर्तन मेळावा घेऊन परिवर्तनासाठी सज्ज राहा, असे सांगून विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे, तर भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. शेवगावमधील आखेगाव येथे युवक परिवर्तन मेळावा पार पडला. शाहीर राजेंद्र कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या महाराष्ट्रगीताने परिवर्तन मेळाव्याला सुरुवात झाली. यावेळी बुथ कमिटी आणि घर तिथे कार्यकर्ता यावर मार्गदर्शन झाले.

यावेळी घुले म्हणाले, "नगर जिल्ह्यात शेवगाव हा अग्रेसर तालुका होता. तो आता पिछाडीवर पडला आहे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने मूलभूत सुविधांसह सर्वच क्षेत्रात शेवगाव तालुका मागे आहे. तालुक्याची वाताहत झाली आहे. याबाबत जागृत राहिले पाहिजे. विशेषकरून युवकांनी परिवर्तनासाठी सज्ज झाले पाहिजे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्या केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विकासकामांचा डांगोरा पिटला जात असून यात स्वार्थ आहे. याबाबत फक्त शेवगावमध्येच नव्हे, तर पाथर्डीतदेखील हीच अस्वस्थता असल्याचे चंद्रशेखर घुले यांनी म्हटले आहे. पंचायत समितीचे माजी सभापती डाॅ. क्षितिज घुले यांनी हा परिवर्तन मेळावा म्हणजे घुले परिवार जनतेसोबत आहे.

कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा मिळावी, यासाठी हा युवक परिवर्तन मेळावा आहे, असे सांगितले. बीडचे समाजप्रबोधनकार डाॅ. ज्ञानदेव काशीद, सुशील शेळके, संजय कोळगे, दिलीप लांडे, काकासाहेब नरवडे, नंदकुमार मुंढे, शेवगाव बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, उपसभापती गणेश खंबरे उपस्थित होते.

(Edited by Amol Sutar)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT