Chandrashekhar Bavankule Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chandrashekhar Bavankule Politics: १७ गुन्हे दाखल, बावनकुळेंचा कॅसिनोचा व्हीडीओ व्हायरल केला...त्याच नेत्यांसाठी आता भाजपच्या पायघड्या!

Chandrashekhar Bavankule; Bawankule ignore local MLA and red carpet for controversial Sudhakar Badgujar-मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची अजब भूमिका, आरोप असल्याने काही होत नाही, भाजपची दारे सगळ्यांसाठी खुली

Sampat Devgire

Sudhakar Badgujar News: अवघ्या चोवीस तासांपूर्वी भाजपच्या आमदारांनी सुधाकर बडगुजर यांना गुन्हेगार म्हणून हिणवले होते. याच नेत्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॅसिनोतील व्हिडिओ व्हायरल केला होता. त्या नेत्याला पक्षात घेण्यासाठी भाजपचे नेते आज आतुर झालेले दिसले.

शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांना उद्धव ठाकरे यांनी काल पक्षविरोधी कारवाया केल्याने बडतर्फ केले. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना गुन्हेगार आणि वादग्रस्त म्हणून हिणविले. यावरून शहरात मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरू आहे

याच सुधाकर बडगुजर यांच्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अक्षरशा आतुर झालेले दिसले. त्यांनी स्थानिक आमदार सीमा हिरे यांनी घेतलेल्या आक्षेपांकडे किरकोळ म्हणून दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर बडगुजर यांच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशाला हिरवा झेंडा देखील दाखवला आहे.

त्यामुळे भाजपने स्वतःच्याच पक्षाच्या आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार आणि उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांसह सर्व पदाधिकाऱ्यांना हिणवले असा संदेश गेला आहे. आमदार हिरे यांनी बडगुजर यांच्या विरोधात गंभीर आक्षेप आणि आरोप केले होते. त्यांच्या विरोधात १७ गुन्हे दाखल असल्याचा दावा केला होता. कोणत्याही स्थितीत त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही असा दावा केला होता.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मात्र एका फटक्यात हे सर्व आक्षेप फेटाळून लावले आहे. आरोप झाल्याने काहीही होत नाही. आरोप सिद्ध कुठे झाले आहेत असे म्हणत काही दिवसांपूर्वी भाजपनेच ज्यांच्या विरोधात गंभीर आरोप, पोलीस कारवाई आणि गाजावाजा करीत टीका केली होती. त्यापासून यू टर्न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बावनकुळे म्हणाले पक्ष वाढीसाठी आणि शत प्रशिक्षत भाजपसाठी येणाऱ्या सर्व नेत्यांना पक्षाचे दरवाजे खुले आहेत. आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करू. श्री. बडगुजर यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा आणि कोणती चर्चा करायची हे काम जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपविले आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मंत्री महाजन हे घेतील असे त्यांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे बडतर्फ नेते बडगुजर यांनी भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात उमेदवारी केली होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काही वाद आणि मतभेद असणे अपेक्षित आहे. त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. ते स्वाभाविक आहे असे म्हणत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नाशिकच्या सर्व नेत्यांना एका फटक्यात बाजूला सारले आहे. त्यामुळे भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही निराशा पसरली.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT