Sharad Pawar, Chandrashekhar Bavankule Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chandrashekhar Bavankule News: बावनकुळे यांची टीका; महायुतीमुळे शरद पवार यांना फिरावे लागले गल्लोगल्ली!

Sampat Devgire

Nashik News: लोकसभा निवडणुकीत राज्यभरात महायुतीने मोठी ताकद लावली होती. त्यामुळे विरोधकांची कोंडी करण्यात यश आले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता शनिवारी झाली. या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) नाशिकमध्ये होते. त्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेला हजेरी लावली. (Chandrashekhar Bavankule News)

यासंदर्भात ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या नियोजित प्रचारामुळे विरोधी पक्षांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल. भाजपने महाराष्ट्रात निश्चित केलेले ४५ प्लस हे उद्दिष्ट पूर्ण होईल.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावरही टीका केली ते म्हणाले, बारामती हा त्यांचा बालेकिल्ला आहे. मात्र हा बालेकिल्ला यंदा महायुती काबीज केल्याशिवाय राहणार नाही. प्रभावी प्रचारामुळे शरद पवार यांची मोठी धावपळ झाली. आमच्या प्रचारामुळे शरद पवार यांना बारामतीत गल्लोगल्ली फिरावे लागले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीचे सर्व नेते पराभूत मनस्थितीत आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले. ते म्हणाले, ज्यावेळेस नेत्यांची अवस्था ठरलेल्या मनस्थितीत जाते. त्यावेळी ते संतापातून चुकीची विधाने करतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख देखील अशीच विधाने करीत आहेत.

गेल्या काही दिवसापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित नसलेल्या गोष्टी त्यांच्या हातून सध्या घडत आहेत. एका विशिष्ट समाजाची मते मिळवण्यासाठी ते आता भगव्या ध्वजाचाही अपमान करू लागल्याची टीका बावनकुळे यांनी केली.

(Edited By : Sachin waghnmare)

SCROLL FOR NEXT