Chandrashekhar Bawankule : चंद्रकांत पाटलांवर अजितदादा नाराज? चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला 'त्या' वक्तव्याचा अर्थ

Baramati Loksabha : शरद पवारांना माहित आहे की तुतारी वाजणार नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना काँग्रेसमध्ये विलीनीकरणा शिवाय कोणताच मार्ग त्यांच्या पुढे राहणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Chandrakant Patil Ajit Pawar Chandrashekhar Bawankule
Chandrakant Patil Ajit Pawar Chandrashekhar Bawankulesarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले होते. मात्र, या मतदारसंघात कमी मतदान झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत शरद पवारांना आव्हान देत बारामतीत शरद पवारांचा पराभव करण्याची भाषा केली होती. त्यासाठी त्यांनी जे शब्द वापरले होते त्यामुळे स्थानिक बारामतीकर नाराज झाले असून त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये झाला असल्याचे अजितदादा समर्थकांचे म्हणणे आहे. 'त्या' वक्तव्यावरून अजितदादा देखील नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी चंद्रकांत पाटलांची पाठराखण केली आहे.

Chandrakant Patil Ajit Pawar Chandrashekhar Bawankule
Ajit Pawar On Chandrakant Patil : ...त्यानंतर चंद्रकांतदादांनी अवाक्षरही काढलं नाही; अजितदादांनी घेतला समाचार!

भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार Sharad Pawar यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे बारामती मतदारसंघात कमी मतदान झाले. याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार Ajit Pawar तक्रार करणार आहेत. या कपोलकल्पित बातम्या तयार केल्या गेल्या आहेत. मतदानासाठी जेव्हा सभा घेतो, मतांसाठी अपील करतो. तेव्हा आपण विरोधकांवर उपरोधात्मक बोलत असतो, यात वेगळे काही नाही'. असे सांगत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी चंद्रकांत पाटील यांची पाठराखण केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'शरद पवारांना माहित आहे की तुतारी वाजणार नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना काँग्रेसमध्ये विलीनीकरणा शिवाय कोणताच मार्ग त्यांच्या पुढे राहणार नाही. दोघेही काँग्रेसमध्ये विलीन होतील. गेल्या अडीच वर्षांपासून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी भूमिका स्वीकारली आहे. काँग्रेस सांगत आहे त्याप्रमाणे उद्धव ठाकरे वागत आहेत. मताच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे काहीही करतील. उद्धव ठाकरे आणि शरद पवार काँग्रेसमध्ये विलीन होतील', असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

ठाकरे, पवारांना मतदार धडा शिकवतील

पंतप्रधान मोदींनी महादेव जानकर यांना लहान भाऊ म्हणून उल्लेख केला आहे. तर महादेव जानकरांची जमानत जप्त करण्याची भाषा उद्धव ठाकरे करत आहे. त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी ते निघालेत. जाणकरांना रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपवण्यासाठी उद्धव ठाकरे निघालेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना अठरा पगड जाती, बारा बलुतेदार मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवतील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

(Edited By Roshan More)

Chandrakant Patil Ajit Pawar Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : 'सोनिया गांधींच्या दरबारात उद्धव ठाकरेंचा मुजरा', चंद्रशेखर बावनकुळेंची जहरी टीका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com