Chandrashekhar Bawankule News : 'संघ ध्वजा'ला फडकं म्हणणं बावनकुळेंच्या जिव्हारी, ठाकरेंचा घेतला समाचार...

Chandrashekhar Bawankule On RSS Flag : सोनिया सेनेची गुलामी, अशा शब्दांत हिणवून उद्धव ठाकरेंकडून भगव्याचा अवमान केला जात असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.
Chandrashekhar Bawankune News
Chandrashekhar Bawankune News Sarkarnama

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ध्वजाला फडकं असं संबोधल्याचा आरोप केला जात आहे. भगव्या ध्वजाला फडकं म्हणणं उद्धव ठाकरेंचा नतदृष्टेपणा आहे, सोनिया सेनेची गुलामी, अशा शब्दांत हिणवून उद्धव ठाकरेंकडून भगव्याचा अवमान केला जात असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

बावनकुळे यांनी एक्स या सोशल प्लॅटफॉर्मवरुन एक ट्विट केले आहे. बावनकुळे म्हणाले, "परम पवित्र भगवा ध्वज करोडो हिंदुंची अस्मिता आणि स्वाभिमान आहे. त्याला फडकं म्हणण्याचा नतदृष्टेपणा उद्धव ठाकरेंनी केला."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrashekhar Bawankune News
NCP Party Symbol Case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाची सुनावणी आता जुलै महिन्यात !

"हाच भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ह्याच झेंड्याखाली शिवसेना उभारली पण उद्धव ठाकरेंना ते फडकं वाटतंय. आज बाळासाहेब ठाकरे असते तर भगव्या ध्वजाचा असा अपमान त्यांनी कधीच सहन केला नसता. पण दुर्दैवानं सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भगव्याचा अवमान करत आहेत," अशा शब्दात बावनकुळेंनी सुनावले.

Chandrashekhar Bawankune News
Dindori Lok Sabha: मुख्यमंत्री शिंदे, बावनकुळे यांच्या हस्तक्षेपाने दिंडोरीची यंत्रणा गतिमान

अटल बिहारी वाजपेयींच्या कवितेची आठवण -

बावनकुळ पुढे म्हणाले, "उद्धव ठाकरे थोडी जनाची नाही तर मनाची लाज उरली असेल तर भगवा ध्वज काय आहे हे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या शब्दात वाचा -"

कभी थे अकेले हुए आज इतने

नही तब डरे तो भला अब डरेंगे

विरोधों के सागर में चट्टान है हम

जो टकराएंगे मौत अपनी मरेंगे

लिया हाथ में ध्वज कभी न झुकेगा

कदम बढ रहा है कभी न रुकेगा

न सूरज के सम्मुख अंधेरा टिकेगा

निडर है सभी हम अमर है सभी हम

के सर पर हमारे वरदहस्त करता

गगन में लहरता है भगवा हमारा॥

भगव्या ध्वजाला फडकं म्हणून तुम्ही कितीही शिव्याशाप दिल्या तरी हाच भगवा सदैव आमचं रक्षण करणार आहे, असेही बावनकुळे (Chandrashekahr Bawankule) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com