chhagan bhujbal sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : महायुतीत नाराज, आगामी 'टार्गेट' निश्चित? छगन भुजबळ थोडक्यात पण थेट बोलले

Sampat Devgire

Nashik News, 31 May : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या आहेत. याबाबत भुजबळ यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला. मी नाराज वगैरे नाही, असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलं आहे.

छगन भुजबळ महायुतीमध्ये नाराज असल्याच्या बातम्या आज वृत्तपत्रांतून आल्या आहेत. लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. मात्र, त्याबाबत कार्यवाही झाली नाही. त्यामुळे भुजबळ नाराज आहेत, असे बोलले जाते.

भुजबळ म्हणाले, मी नाराज वगैरे काहीही नाही. असल्या बातम्यांमध्ये काहीही अर्थ नाही. माझी जी काही भूमिका आहे, ती कायम असते. त्यावर मी बोलतो. आजवर बोलत आलो आहे. नाराज असल्याच्या बातम्या तथ्यहिन असल्याचे सांगून एका वाक्यात त्यांनी हा विषय संपवला आहे. अशा बातम्या कशा आल्या? कुठून आल्या? याबद्दल देखील त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भुजबळ यांना लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे. राज्यात रिक्त झालेल्या एका जागेवरील निवडणूक आगामी काळात होऊ शकते. त्यावेळी भुजबळ राज्यसभेवर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

भुजबळ यांनी आपल्याला राज्यसभेवर जाण्यात कुठलाही रस नाही. तूर्त असे काही असल्याची माहिती मला नाही. त्यामुळे यावर मत व्यक्त करणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT