Chhagan Bhujbal Displeased : महायुतीमध्ये छगन भुजबळ नाराज, विधानसभेपूर्वी धोक्याची घंटा?

Mahayuti : भुजबळ यांनी देखील महाविकास आघाडीचे नेते जेव्हा जेव्हा अडचणीत आले. त्या त्यावेळी त्यांची पाठराखण केली.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

Chhagan Bhujbal News : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर माफी मागितली होती. आव्हाड यांना घेरण्याची संधी भाजपने सोडली नाही. आव्हाडांविरोधात राज्यभर आंदोलन होत असताना महायुतीमधील अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे महायुतीच्या विरोधात सातत्याने विधान करणारे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांची नाशिकमधून महायुतीचे उमेदवारी निश्चित झाली होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील भुजबळ यांच्या नावाला पसंती दिली होती. मात्र, शिंदे गटाने या जागेवरील आपला दावा सोडला नाही.

नाशिकमधून शिंदे गटाचे Shinde group उमेदवार हेमंत गोडसे लढले. तेव्हापासून भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा होत्या. विधानसभेपूर्वी छगन भुजबळ यांंची नाराजी ही महायुतीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

भुजबळ यांनी देखील महाविकास आघाडीचे नेते जेव्हा जेव्हा अडचणीत आले. त्या त्यावेळी त्यांची पाठराखण केली. घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या अपघातानंतर होर्डिंग मालक भावेश भिंडे यांचा उद्धव ठाकरेंसोबत फोटो व्हायरल झाला होता.

Chhagan Bhujbal
Bhujbal Warning to BJP : भुजबळांनी टोचले भाजपचे कान; विधानसभा निवडणुकीतील संभाव्य धोकाही सांगितला!

या फोटो नंतर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात येत होती. मात्र, त्या वेळी देखील ठाकरे यांच्या मदतीला भुजबळ धावेल. सरकार आमचे, पालिका आमची मग उद्धव ठाकरेंच्या याच्याशी काय संबंध, असा सवाल भुजबळ यांनी केला होता.

राज्यसभा मिळणार?

छगन भुजबळ लोकसभा लढण्याच्या इच्छुक असूनही संधी मिळाली नाही. राज्यसभेच्या काही जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे भुजबळ यांना किंवा त्यांचे पुतणे यांना राज्यसभेवर संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यसभेच्या माध्यमातून भुजबळ यांची नाराजी दूर केली जाणार असल्याची देखील चर्चा आहे.

भुजबळांनी महायुतीच्या विरोधातील वक्तव्य

- निवडणुकीत शरद पवार, उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आहे.

- मला उमेदवारी नाकारल्यामुळे ओबीसी समाजामध्ये नाराजी आहे.

- पंतप्रधानांनी चारशे पारचा नारा दिला. मात्र, संविधान बदलणार हे दलितांच्या मनावार इतके बिंबवले की ते काढताना नाकी नऊ आले.

- मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात चंचूप्रवेश नको.

Chhagan Bhujbal
Rahul Gandhi News : मोठी बातमी ! पुणे सत्र न्यायालयाचा राहुल गांधींना दणका; 'या' प्रकरणी दिला मोठा आदेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com