NCP-BJP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारमध्ये सहभागी झाला आहे. मात्र सरकारमध्ये सहभागी होऊन देखील भिन्न राजकीय विचारसरणीमुळे त्यांच्यात खटके उडू लागल्याचे चित्र आहे. (Chandrashekhar Bawankule claimed that Ajit Pawar will campaigne for BJP )
भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविषयी केलेल्या विधानाने छगन भुजबळ (Chahgan Bhujbal) चांगलेच संतापले आहेत.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार लोकसभा निवडणुकीत हे भाजपचा प्रचार करतील, असे विधान केले होते. त्याचे हे विधान चर्चेत आले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी देखील संभ्रमात पडले आहेत.
यासंदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते भुजबळ यांना या संदर्भात विचारले असते, त्यांनी याबाबत बावनकुळे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. भुजबळ म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार भारतीय जनता पक्षाचा प्रचार करतील हे विधान बावनकुळे यांनी कशाच्या आधारे केले आहे?. त्यांना सर्व आधीच दिसू लागले आहे काय?. ते आता पंडित तर नाही झाले ना?. असा प्रश्न त्यांनी केला.
श्री. भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री पवार हे भाजपचा नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे भाजपने राजकीय सोय म्हणून एकनाथ शिंदे यांना ज्या सहजगत्या भाजपशी एकरूप केले,तेव्हढे राष्ट्रवादी काँग्रेसला करणे शक्य झालेले दिसत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.