Narhari Zirwal : वादग्रस्त अधिकाऱ्यांवर नरहरी झिरवाळांची कृपादृष्टी?

Narahari Zirwal`s recommendation for Controversial medical officer of NMC-वादग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी शिफारस केल्याने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आले चर्चेत.
Narhari Zirwal
Narhari ZirwalSarkarnama
Published on: 
Updated on: 

Narhari Zirwal controversy : गर्भलिंगनिदान चाचणी प्रकरणी कारवाई झालेल्या डॉ. राजेंद्र भंडारी यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या वादग्रस्त अधिकाऱ्याची चौकशी होण्याऐवजी त्याच अधिकाऱ्याच्या पुर्नस्थापनेसाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिफारस केल्याचे पुढे आले आहे. (Medical officer in trouble in case of illegal pregnancy diagnosis)

यासंदर्भात मुख्यमंत्री (Eknath Shinde) कार्यालयाकडे या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पुर्नस्थापनेसाठी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी पत्र दिल्याचे उघडकीस आल्याने तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. यानिमित्ताने अधिकाऱ्यांच्या (NMC) बदल्यांसाठी आमदार, मंत्र्यांच्या शिफारस पत्राचा विषय देखील चर्चेत आहे.

Narhari Zirwal
Narendra Modi Pune Visit : 'इतिहासातील अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या...; पुण्यात येण्याआधीच मोदींचे ट्विट चर्चेत

ग्रामपंचायतपासून तर शहरातील विकासकामांपासून तर अधिकाऱ्यांच्या बदल्यांपर्यंत शिफारसपत्र देण्याचा प्रघात आहे. राज्य सरकारने सत्ताधारी तसेच आमदारांच्या सोयीसाठी केलेल्या या नियमांमुळे शिफारसपत्र देणाऱ्याचे किती व पत्र घेणाऱ्याचे काय व कसे भले होते, काय हितसंबंध असतो हे लपुन राहिलेले नाही. त्यामुळे मलईदार विभाग आणि त्यातील बदल्यांसाठी ही पद्धत सर्रासपणे आमलात आहे. त्यातून अनेकदा लोकप्रतिनिधी अडचणीत देखील आलेले आहेत.

दरम्यान या पद्धतीत रुळलेले नरहरी झिरवाळ मात्र यामध्ये चांगलेच अडचणीत आले आहेत. नाशिक महापालिकेतील वैद्यकीय विभागातील डॉ. राजेंद्र भंडारी नियमबाह्य गर्भलिंगनिदान चाचणीत सापडल्याने त्यांच्यावर महापालिकेने कारवाई करून त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र चौकशी होण्याऐवजी चौकशीची जबाबदारी असलेल्या पदावरच त्यांच्या नियुक्तीची शिफारस झाल्याचे आढळले. ही शिफारस नरहरी झिरवाळ यांनी दिली होती. त्यामुळे वादग्रस्त अधिकाऱ्याला बढतीची शिफारस कशी दिली जाते? असा प्रश्न विचारला जात आहे.

Narhari Zirwal
Sharad Pawar Greets PM Modi : व्यासपीठावर पोचताच शरद पवार अन॒ नरेंद्र मोदी रमले हास्यविनोदात...

दरम्यान महापालिकेतर्फे चौकशी सुरू असतानाच शासनाकडून या नियुक्तीची शिफारस आली. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी ती नियमबाह्य ठरत असल्याने रद्द केली. त्यानंतर झिरवाळ यांनी थेट मुख्यमंत्र्यांना ही शिफारस केल्याने त्यांना दिंडोरी या आदिवासी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या झिरवाळ यांना नाशिक महापालिकेच्या या प्रकरणात एव्हढा रस का?, हे न उलगडलेले कोडे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com