Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Audio Viral : 'भुजबळसाहेब आमच्या बांधावर येऊ नका, नाहीतर वातावरण खराब...'; ऑडिओ क्लिप व्हायरल!

Chetan Zadpe

Nashik News : मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे शेती आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालेले आहे. नुकसान झालेल्या भागाची पाहणी राज्याचे मंत्री छगन भुजबळ करणार आहेत.

मात्र, त्यांच्या या पाहणी दौऱ्याला काही तरुणांनी फोन करून विरोध केला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर तरुणांनी त्यांना आमच्या बांधावर येऊ नका, नाहीतर वातावरण खराब होईल, असं म्हणत विरोध दर्शवला आहे. याची ऑडिओ क्लिपदेखील आता व्हायरल झाली आहे. (Latest Marathi News)

'आम्ही नुकसान सोसणार, पण तुम्ही काय आमच्या बांधावर येऊ नका', असं या व्हिडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. आम्हाला शासनस्तरावरच जे काही नुकसानीची भरपाई आहे, ती उपलब्ध करून द्या, पण त्या आमच्या बांधावर येण्याचा हट्ट करू नका, असेही या क्लिपमध्ये भुजबळांना तरुणांनी म्हटले आहे. ही ऑडिओ क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, भुजबळ हे गारपीटग्रस्त भागाचा, नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. या ऑडिओत त्यांना विरोध तरुणांचा आणि त्यांचा संवाद झाला आहे. या क्लिपमध्ये भुजबळ म्हणतात, 'मला कुणीही गावबंदी करू शकत नाही आणि मी कुणाला घाबरत नाही, तुम्ही चार जण म्हणजे गावं होता का रे ? असं भुजबळांनी तरुणांना म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ऑडिओ क्लिपमधला संवाद -

तरुण : भुजबळसाहेब, सोमठाणेदेश येथून बोलत आहे, तिथे आज तुमचा दौरा आहे, सकल मराठा समाजाच्या वतीने भुजबळसाहेब तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आमच्या बांधावर येऊ नका.

भुजबळ : ठिकंय, बघू काय करायचे ते?

तरुण : तुम्ही आमच्या गावात आले तर वातावरण खराब होऊन जाईल. आमची विनंती आहे तुम्ही येऊ नये.

भुजबळ : बरं... बरं...

तरुण : जमिनीचा 7/12 आमच्या बापाच्या नावावर आहे. तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला आहे तो बघा, हात जोडून विनंती आहे येऊ नका.

भुजबळ : असं आहे, मला कोणी म्हटलं या, तर मी जाणार, नाही म्हटलं तर बघू...

तरुण : आमच्या गावचा ठराव झालेला आहे. कोणालाही गावात येऊ द्यायचे नाही, त्यामुळे तुम्ही येऊ नका...

भुजबळ : तुम्ही चार लोक म्हणजे ठराव होतो का?

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT