Chhagan Bhujbal : भुजबळ आता कोणावर तोफ डागणार ?; समताभूमी, फुलेवाड्यातील कार्यक्रमाकडे दोन्ही समाजाचे लक्ष!

Samatabhumi Phulewada : मनोज जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

Pune News : मागील काही महिन्यांपासून मराठा-ओबीसी आरक्षणावरून राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे आणि ओबीसी समाजाचे नेते तसेच राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे.

दरम्यान, मंगळवारी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे वितरण होणार असून, या वेळी छगन भुजबळ कोणावर तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास भुजबळ यांनी विरोध केला असून, कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदीसाठी स्थापन करण्यात आलेली शिंदे समितीच बरखास्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शिवाय मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यास आपला विरोध असल्याचे भुजबळ यांनी यापूर्वीच जाहीर केलेले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange : विदूषक कोण, हेच आता दिसून आले..! भुजबळांचा जरांगेंवर पलटवार

राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारमध्ये भुजबळ हे मंत्री असून, मराठा आरक्षणाबाबतच्या रोख ठोक भूमिकेमुळे ते चांगलेच चर्चेत आलेले आहेत. सोमवारी २७ नोव्हेंबरला शासकीय विश्रामगृहात मुक्कामी असलेल्या भुजबळ यांच्या विरोधात स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी आंदोलन करून तुमची गाडी फोडण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा देत त्यांना एकप्रकारे धमकीच दिली आहे. यामुळे पुढील काही दिवसांत हा वाद अधिक वाढण्याची शक्यता आहे.

तर उद्या २८ नोव्हेंबरला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे वितरण होणार आहे. समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार असून, ते यासाठी उपस्थित राहणार आहेत.

त्यामुळे आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने सध्या सुरू असलेल्या मराठा-ओबीसी आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ कोणावर तोफ डागणार? याकडे मराठा समाजासह ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांचेही लक्ष लागले आहे.

Chhagan Bhujbal
NCP News : ...म्हणून मावळात राष्ट्रवादीला पाच महिन्यांपासून अध्यक्षच नाही!

कार्यक्रमाच्या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त -

समताभूमी, फुलेवाडा येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सोमवारी शासकीय विश्रामगृह परिसरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. स्वराज्य संघटनेने गाडी फोडण्याची धमकीदेखील छगन भुजबळ यांना दिलेली आहे.

जिथे पोलिसांवर हल्ले होतात तिथे माझे काय? असा प्रश्न उपस्थित करत भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे. या सर्व घटना लक्षात घेता या कार्यक्रमामध्ये कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांशी नक्की काय झाले बोलणे -

मराठा-ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेला वाद थांबविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. छगन भुजबळ यांच्याशी बोललो असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे. मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमात भुजबळ नक्की काय भूमिका घेतील, यावरून मुख्यमंत्री शिंदे आणि भुजबळ यांच्यात काय चर्चा झाली, याचा उलगडा होणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com