Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा, याबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. या वेळी शरद पवार यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या हुकूमशहाच्या आरोपांचे जारदार खंडन करण्यात आले. शरद पवार हुकूमशहा पद्धतीने पक्ष चालवत होते, तर तुम्ही पक्षांतर्गत निवडणूक का लढवली नाही, असा प्रतिप्रश्न करण्यात आला. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नॉमिनेशन अर्जावर अजित पवारांची सही असल्याकडेही राष्ट्रवादीचे वकील देवदत्त कामत यांनी आयोगाचे लक्ष वेधले.
निवडणूक आयोगात बाजू मांडण्यासाठी बुधवार हा (Sharad Pawar) शरद पवारांचा शेवटचा दिवस होता. या वेळी त्यांचे वकील कामतांनी पवारांवरील आरोपांचे खंडन केले. तसेच प्रतिप्रश्न उपस्थित करून अजित पवार गटाची कोंडी केली आहे. सुनावणीदरम्यान, कामत म्हणाले, राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड झाली, त्यावेळी अजित पवार तिथेच होते. त्यावेळी त्यांनी पवारांच्या मनमानी कारभारावर आक्षेप का घेतला नाही. तसेच पवारांच्या निवडीवर आक्षेप होता, तर त्यांनी निवडणूक का लढली नाही ?, असे प्रश्न अजित पवार गटाला केले आहेत.
बंडानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाने निवडणूक आयोगात जात शरद पवारांवर हुकूमशहा पद्धतीने पक्ष चालवण्याचा आरोप केला होता. यावर युक्तिवाद करताना कामतांनी, 'हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवला जात होता, तर त्याचवेळी पक्षांतर्गत निवडणूक का घेतली नाही. उलट अध्यक्ष म्हणून पवारांच्या नॉमिनेशन अर्जावर अजित पवारांचीच सही आहे. तसेच पवारांच्या अध्यक्ष म्हणून निवडीवर गाव, तालुका अशा कुठल्याही स्तरावरून आक्षेप नोंदवला गेला नाही किंवा त्यांची निवड चुकीची आहे, असेही म्हटलेले नाही. त्यामुळे अजित पवार गटाने उपस्थित केलेला दावाच मुळात चुकीचा आहे,' असेही कामत यांनी म्हटले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार गटावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार गटाने खोटी कागदपत्रं सादर केली आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीतील सहभागी सदस्यांची दिलेली माहिती खोटी असल्याचा आरोप करण्यात आले आहेत. परिणामी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनावणीत ट्विस्ट आला आहे. आता राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगण्यासाठी गुरुवारपासून अजित पवार गट भूमिका मांडणार आहे. या सुनावणीकडे राज्याचे लक्ष आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.