Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : सरस्वती देवीचे फोटो काढा असे मी म्हणलो नाही!

सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा काढल्याने सरस्वती ऐवजी यांची पूजा करा असे मी म्हणाल्याचे छगन भुजबळ म्हणाले.

Sampat Devgire

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचे फोटो शाळांमध्ये लावावीत. महापुरुषांचे फोटो लावावेत. सरस्वती (Sarswati) व देव देवतांच्या (Goddess) फोटोंऐवजी महापुरुषांचे फोटो लावावेत या विधानावरून हिदूत्ववादी (Hindutwawadi) संघटनांनी विरोध केला. मात्र श्री. भुजबळ आपल्या मतावर ठाम आहेत. (Chhagan Bhujbal is firm on His statement regarding Schools)

सत्यशोधक समाज स्थापना दिनानिमित्त महात्मा फुले समता परिषदेतर्फे सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात श्री. भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले होते.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष तसेच काही हिदूत्ववादी संघटनांनी भुजबळ यांच्या विधानाचा विरोध केला. त्याबाबत शासनाने सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाहीत, अशी भूमिका जाहीर केली. एकंदरच भुजबळ यांच्या विधानावर राजकारण सुरु झाले.

यासंदर्भात आज भुजबळ म्हणाले, मी कुठेही सरस्वती देवीचे फोटो काढा असे मी म्हणलेलो नाही. माझ्या वक्तव्याचे राजकीयकरण का केला जात आहे, हे मला कळत नाहीये. माझं मत मांडण्याचा मला पूर्ण अधिकार या देशात आहे. मी काय देशाच्या विरोधात बोललो नाही. महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील हे आपले देव आहेत.

ते म्हणाले, या महापुरुषांनी शिक्षणासाठी खूप काम केले आहे. या लोकांनी आपल्याला शिक्षण दिले आहे. सरस्वतीचे आपण पूजन करतो. ते काय आपल्याला शिकवले नाही. त्यांनी कुठे शाळा काढली?. सावित्रीबाई फुले यांनी यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. त्यामुळे मी सरस्वती ऐवजी त्यांची पूजा करा असं म्हणालो. मी कुठेही सरस्वती देवीची फोटो काढा असे मी म्हणलो नाही.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT