नंदुरबार : सातपुडा (Nandurbar) भागाला गुजरात (Gujrat) व मध्य प्रदेशशी (Madhya Prahdesh) जोडणारा रंका नदीवरील पुल आज सकाळी कोसळला. त्यामुळे या भागाचा गुजरातशी (Gujrat) संपर्क खंडीत झाला. हा पुल कोसळल्याने प्रशासनाने याबाबत पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पुल कोसळल्याची चौकशी करण्यात येणार आहे, असे सुत्रांनी सांगितले. (Nandurbar districts Dhanora Bridge collapse today)
नंदुरबार तालुक्यातील गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या धानोरा येथील रंका नदीवरील पूल आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास अचानक कोसळला. सुदैवाने यावेळी कोणतेही वाहन या पुलावरून जात नव्हते . हा पूल ४५ वर्ष जुना होता. या मार्गावरील गुजरात व महाराष्ट्राची वाहतूक ठप्प झाले आहे. संबंधित विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
महाराष्ट्रातून गुजरातला जोडणारा महत्त्वाच्या मार्ग असून या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते.
तालुक्यातील धानोरा ते इसाईनगर दरम्यान रंका नदीवरील पुल उभारण्यात आला होता . हा रस्ता महामार्ग असून गुजरात व महाराष्ट्र राज्याला जोडतो. आज सकाळी ८.४५ वाजेदरम्यान अचानक हा पुल कोसळला त्यामुळे पूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांच्यासह प्रशासनाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथील पुलाची मुदत पूर्ण झाल्याने पुल सर्व बाजूंनी खचला होता. त्यामुळे तो कधीही पडणार होता. त्या मार्गावरून असंख्य अवजड वाहतूक जात असते. पुलाची क्षमता संपल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. पुल दुरुस्त करण्याची जबाबदारी कोणाची? सार्वजनिक बांधकाम विभागची की राष्ट्रीय महामार्ग विभागाची? याबाबत विचारणा होत आहे.
....
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.