Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal On Onion : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी छगन भुजबळ सरसावले; केली मोठी घोषणा !

Onion Producer Farmer Nashik : शेतकऱ्यांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणार

सरकारनामा ब्यूरो

Nashik Political News : कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्याने राज्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. यावर केंद्राने दोन लाख टन कांदा २४१० रुपये प्रतिक्विंटल भावाने विकत घेण्याचा निर्णय घेतला तरी शेतकऱ्यांतील असंतोष कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर राज्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. कांद्याच्या भावाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या घोषणेनंतर ते काय निर्णय घेणार याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आहे. (Latest Political News)

भुजबळांनी शनिवारी लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार समितीस भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, "कांद्याच्या प्रश्नाबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली आहे. यासोबतच नाशिक जिल्ह्यात नाफेडचे कांदा खरेदी केंद्र वाढविण्याची मागणी केली असून ही केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. कांद्यास अनुदान मिळण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरवा केला आहे. त्यानुसार कांद्यासाठी ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान राज्य शासनाने मंजूर केले आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ८६५ कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे."

हे अनुदान दोन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचेही भुजबळांनी यावेळी स्पष्ट केले. ८६५ कोटी रुपयांपैकी ४६५ कोटी अनुदान वितरीत करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. यात ६० टक्के जिल्ह्यातील आहेत. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४३५ कोटी रुपये वितरित होणार आहेत", अशी माहिती मंत्री भुजबळांनी दिली.

कांद्याच्या दरासाठी स्थानिक पातळीवर बैठक घेणार असल्याचे भुजबळांनी सांगितले. ते म्हणाले, पाऊस कमी झाल्याने यावर्षी कांद्याचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे कांद्याच्या प्रश्नाबाबत तोडगा काढण्यासाठी शासनस्तरावर आणि शेतकरी प्रतिनिधी, कांदा व्यापारी, बाजार समित्यांचे पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक घेण्यात येणार आहे. यात सर्वांच्या समस्या जाणून घेवून योग्य निर्णय घेतला जाईल, असेही भुजबळांनी सांगितले.

यावेळी बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, संचालक जयदत्त होळकर, पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे, ज्ञानेश्वर जगताप, छबुराव जाधव, ललित दरेकर, तानाजी आंधळे, रमेश पालवे, डॉ. श्रीकांत आवारे, भीमराज काळे, सोनिया होळकर, सचिव नरेंद्र वाढवणे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था फैयाज मुलाणी, सरपंच सचिन दरेकर, नाफेडचे अधिकारी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT