Kolhapur News : कमी बोल, तुझी तब्येत चांगली राहील... शरद पवारांचा बहिणीला कानमंत्र

Sharad Pawar खासदार शरद पवार यांनी आज खासगी रुग्णालयात जाऊन बहिण सरोज पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली.
Sharad Pawar, Saroj Patil
Sharad Pawar, Saroj Patilsarkarnama

Kolhapur Sharad Pawar News : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचं राजकारणापलीकडे एक वेगळं नातं कोल्हापुराशी आहे. त्यांची सर्वात लहान बहीण सरोज पाटील या देखील कोल्हापुरात राहतात. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना खासगी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. याची माहिती शरद पवार यांना सभा संपल्यानंतर देण्यात आली. आज त्यांनी थेट रुग्णालय गाठलं आणि बहिणीची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. बहिणीने ठणठणीत रहावे, यासाठी कमी बोल, तुझी तब्येत चांगली राहील, असा कानमंत्र दिला.

राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार Sharad Pawar दोन दिवस कोल्हापूरच्या Kolhapur दौऱ्यावर होते. काल सायंकाळी त्यांची कोल्हापूरात सभा झाली. श्री. पवार यांचं राजकारणापलीकडे एक वेगळं नातं कोल्हापुराशी आहे. कोल्हापूर हे त्यांचे आजोळ आहे. तर त्यांची सर्वात लहान बहीण सरोज या देखील कोल्हापुरात राहतात.

राजकारणापलीकडे जाऊन पवार यांनी आपली माणसं कोल्हापुरात जोडली आहेत. शुक्रवारी सभा सुरु असताना रुईकर कॉलनी इथं राहणाऱ्या सरोज पाटील यांची तब्येत बिघडल्याने त्यांना खासगी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं. त्या घटनेची माहिती पवार यांना सभा संपल्यानंतर देण्यात आली.

आज शनिवारी राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर श्री. पवार थेट सरोज पाटील दाखल असलेल्या दवाखान्यात दाखल झाले. बहिणीची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. सुमारे पाऊणतास त्यांच्याशी गप्पा मारल्या. दोघेही हसत खेळत गप्पा मारताना पाहून उपस्थित देखील त्यांच्या आनंदाचा क्षण न्याहळत होते.

Sharad Pawar, Saroj Patil
Satara Political News : सातारा लोकसभेबाबत खासदार उदयनराजेंची सावध प्रतिक्रिया; म्हणाले, लोकांचा आग्रह लक्षात...

पवार यांच्या भेटीने जणू सरोज पाटील यांच्यासाठी रक्षाबंधनची भेट म्हणावी. असा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं होता. बहिणीने ठणठणीत रहावे, यासाठी त्यांना कानमंत्र दिला. कमी बोल, तुझी तब्येत चांगली राहील, असे म्हणताच दोघांमध्ये हशा पिकला. पाऊण तासांनी पवार साहेब रुग्णालयातून बाहेर पडले.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com