Devendra Fadnavis Vs Nana Patole : जपानवरून येताच देवेंद्र फडणवीस नाना पटोलेंवर बरसले; म्हणाले...

BJP Vs Congress Political News : "पंतप्रधान शास्त्रज्ञांचे कौतुक करणार नाही तर कोण करणार?"
Devendra Fadnavis, Nana Patole
Devendra Fadnavis, Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : चांद्रयान ३ ने लॅडिंग केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण आफ्रिकेतून ऑनलाइन सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत मोहीम फत्ते झाल्याचा आनंद व्यक्त केला. यावरून देशातील विरोधकांनी मोदींसह भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. या टीकेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानवरून येताच खरपूस समाचार घेतला. 'जगाचे लक्ष लागलेली मोहीम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान शास्त्रज्ञांचे कौतुक करणार नाही तर कोण करणार', असा प्रश्न उपस्थित करत 'काँग्रेस वैफल्यग्रस्त पक्ष झाल्या'चा टोला फडणवीसांनी लगावला. (Latest Political News)

Devendra Fadnavis, Nana Patole
Devendra Fadnavis From Japan : जपानला गुंतवणुकीसाठी भारतच सुरक्षित वाटतो; देवेंद्र फडणवीसांनी घेतला भविष्याचा वेध

जपान दौऱ्यावरून परतल्यानंतर मुंबईत फडणवीसांनी (Devendra Fadnavis) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जपान दौरा सफल झाला असून भविष्यात देशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सकारात्मक असल्याची माहिती दिली. तसेच तेथील दूतावासात मराठी लोकांसोबत चांद्रयानाचे लॅडिंग पाहिले असून तो क्षण अविस्मरणीय असल्याचे सांगितले. यावेळी विरोधकांनी मोदींवर केलेल्या टीकेबद्दल फडणवीसांना छेडले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दात पलटवार केला.

फडणवीस म्हणाले, "काँग्रेस हा वैफल्यग्रस्त पक्ष आहे. त्यांनी देशाचा विचार करणे खूप आधीच सोडून दिलेले आहे. चांद्रयानाचे यश आणि शास्त्रज्ञांचे कौतुक करण्यासाठी पंतप्रधान जाणार नाही तर कोण जाणार ? त्यांच्यासारखे खालच्या पातळीवर राजकारण करणारे आजपर्यंत पाहिले नाहीत."

Devendra Fadnavis, Nana Patole
Bawankule on Anil Deshmukh : अनिल देशमुख सध्या जमानतीवर बाहेर आहेत, त्यांनी ‘ऑर्डर’ नीट वाचली नाही, असं वाटतंय !

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) फडणवीस गृहमंत्री असताना फोन टॅपिंगची फाईल बंद कशी होते, असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावर बोलताना फडणवीसांनी पटोलेंवर टीका केली. "नाना पटोलेंना मी कधीच गांभीर्याने घेतले नाही. ते सकाळी एक, दुपारी दुसरे आणि संध्याकाळी तिसरेच बोलतात. मी जपानमधून देशासाठी, राज्यासाठी काहीतरी घेऊन आलो आहे. ते राज्यभर का फिरतात हे त्यांनी सांगावे."

"भारतात उद्योगांसाठी योग्य वातावरण असून देश मोठ्या गुंतवणुकीसाठी तयार आहे.भारत उद्योगांसाठी अधिक सुरक्षित देश असल्याचे मत जपानच्या मंत्र्यांचे आणि मोठ्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जपान भविष्यात आपल्या देशात मोठी गुंतवणूक करण्यास सकारात्मक आहे. विविध प्रकल्पासांसाठी केंद्राच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवण्याची विनंती जपानकडून करण्यात आली", असे सांगून फडणवीसांनी भारताच्या आणि महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध घेतला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com