Dada Bhuse, Chhagan Bhujbal & Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : भुजबळांनी हट्ट सोडल्याने शर्यतीतला एक गडी झाला कमी, गिरीश महाजन व दादा भुसेंना दिलासा

Chhagan Bhujbal withdraws from Nashik Guardian Minister race, bringing relief to Girish Mahajan and Dada Bhuse : नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा आजूनही कायम आहे. अशातच छगन भुजबळ यांनी मोठं विधान केल्याने दादा भुसे व गिरीश महाजन यांना दिलासा मिळाला आहे.

Ganesh Sonawane

Nashik Guardian Minister : नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा आजूनही कायम आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या रेसमध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन व शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे हे दोघे आहेत. मात्र छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिल्यानंतर पालकमंत्री पदाच्या शर्यतीत तिसऱ्या भिडूची एण्ट्री झाल्याची चर्चा होती.

त्यामुळे आता महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी हे तीन्ही पक्ष पालकमंत्रीपदावर दावा करत आहेत. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळ समर्थकांनी भुजबळांना पालकमंत्री केलं जावं ते जेष्ठ व अनुभवी आहेत. शिवाय राष्ट्रवादीचे सर्वांधिक आमदार जिल्ह्यात असल्याने राष्ट्रवादीचा पालकमंत्री असावा अशीही मागणी पुढे आल्याने दादा भुसे व गिरीश महाजन दोघांचेही टेन्शन वाढलं होतं.

मात्र काल छगन भुजबळ यांनी पालकमंत्रीपदाविषयी मोठं विधान केलं. मी पालकमंत्रीपदाच्या वादात पडू इच्छित नाही. पालकमंत्रीपदासाठी माझा कोणताही हट्ट नाही. मला नाशिकसाठी जे करायचे होते ते मी करत आहे. ते मी पालमंत्री असलो किंवा नसलो तरी करत राहील. त्यामुळे भुजबळांनीच पालकमंत्रीपदाचा हट्ट सोडल्याने दादा भुसे व गिरीश महाजन यांना दिलासा मिळाला आहे. भुजबळांना पालकमंत्रीपदात काही रस दिसत नाही अशी चर्चा सुरु झाली आहे.

नाशिकच्या पालकमंत्रीपदावर भाजपचे गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र नाशिकमध्ये दादा भुसे यांच्याऐवजी गिरीश महाजन यांची निवड करण्यावरुन भाजप व शिवसेनेत मतभेद निर्माण झाले. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही पालकमंत्रीपदावर दावा केला. महाजनांच्या नावाला अधिकच विरोध वाढल्याने त्यांच्या नावाला स्थगिती देण्याची नामुष्की आली.

त्यामुळे भुसे व महाजन यांच्यातील हा संघर्ष सुरु असतानाच सुरुवातीला मंत्रिपदापासून डावलण्यात आलेल्या छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर दोघांत तिसरा अशी परिस्थिती निर्माण झाली. पालकमंत्रीपदाची स्पर्धा अधिकच वाढली. मात्रा भुजबळांनी आपला तसा काही हट्ट नसल्याचे सांगितल्याने महाजन व भुसे हे दोघेच आता पालकमंत्रीपदाच्या रेसमध्ये उरल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT