
Nashik Shinde Sena : नाशिक महापालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने पक्षात कोणताही वाद नको म्हणून पक्षाचे जेष्ठ नेते व मंत्री शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पुढाकार घेतला. नाशिकमधील निवडणुकीसंदर्भातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकारही दादा भुसे यांच्याकडे पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे दादा भुसे यांच्याच खांद्यावर मनपा निवडणुकीची जबाबदारी आहे, असं म्हणायला काही हरकत नाही.
गेल्या दीड दोन वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्या नाशिकच्या शिवेसेनेत दोन गटांमध्ये काहीसा वाद आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (ता. १३) दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांना रात्री एकत्र बसवत हा वाद मिटवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भुसे यांनी उपनेते विजय करंजकर, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांना सगळ्यांना सोबत घेऊन भुसे यांनी हा वाद मिटवल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच दोन्ही गट आता एकत्र आल्याचे चित्र आहे.
अनेकदा निवडणुकांमध्ये पक्षातील अंतर्गत वाद व गटबाजीचा पक्षाला मोठा फटका बसत असतो. तो बसू नये म्हणूनच दादा भुसे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र बसवून त्यांची समज घातली. आपआपसातील वाद मिटवला तरच महापालिकेतील लक्ष आपल्याला गाठता येईल याची जाणीव भुसे यांनी करुन दिल्यानंतर दोन्ही गट शनिवारी एकत्र फिरताना दिसले.
दरम्यान शिवसेना शिंदे गटाने महापालिका निवडणूक ही महायुती म्हणूनच लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसा निरोप पोहचवण्यासाठी मंत्री उदय सामंत हे खास नाशिक मध्ये आले होते. पक्षासंदर्भातील कसलीय भूमिका किंवा निर्णय घ्यायचा असेल तर तो दादा भुसे घेतील अशा सूचना पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. कोणीही निवडणुकीसंदर्भात काहीही स्टेटमेंट देऊ नये अशाही सूचना आहेत.
भाजपनेही महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. १०० हुन अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष भाजपने ठेवले आहे. त्यासाठी पक्षात मोठे इन्कमिंग करण्याच्या तयारीत भाजप आहे. सुधाकर बडगुजर, गणेश गिते यांना देखील पक्षात घेण्याची तयारी भाजपकडून सुरु आहे.
त्यामुळे भाजपपाठोपाठ शिनसेनेने देखील आपला पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. मध्यंतरी शिवसेनेत विजय करंजकर, प्रवीण तिदमे विरुद्ध बोरस्ते यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. या वादाचा परिणाम म्हणून शिंदे गटात अन्य पक्षातील नेते येण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. शिवाय काही कारणास्तव युती होऊ शकली नाही तर स्वबळावरही लढण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. त्यामुळे दादा भुसे यांनीच हा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली. त्यामुळे आपआपसातील वाद मिटवून सगळ्यांनी एकत्र राहा अशी समजूत घातल्यानंतर दोन्ही गट एकत्र झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.