
Chhagan Bhujbal& Devyani Pharande : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर द्वारका परिसरातील वाहतूक कोडींच्या व अतिक्रमणाच्या प्रश्नावरुन महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ व भाजपच्या मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचं दिसत आहे.
चार दिवसांपूर्वी आमदार फरांदे यांनी या प्रश्नी महापालिकेत बैठक घेतली होती. द्वारका व परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी त्या स्वत:रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यापाठोपाठ अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही याच प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी शनिवारी अचानक या भागाचा पाहणी दौरा करत अधिकाऱ्यांना खडसावलं. अतिक्रमण हटवा अन्यथा मी रस्त्यावर उतरेल असा इशारा भुजबळांनी दिला.
भुजबळांच्या इशाऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनपा व पोलिस प्रशासनाने या भागात कारवाई केली. या परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आलं. त्यामुळे येथे वाहतुक कोंडी कमी झाली. त्यानंतर पालिकेने ज्या ठिकाणी कारवाई केली त्याच ठिकाणी आता राष्ट्रवादी युवक कॉंग्रसेच्या वतीने द्वारका सर्कल येथील वारंवार होणाऱ्या वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना केल्याबद्दल 'भुजबळ साहेब धन्यवाद' असे फलक लावण्यात आल्याने श्रेयवादाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
द्वारका चौक हा नाशिक शहरातील एक महत्वाचा चौक आहे. मिनिटाला शेकडो वाहने येथून जातात. मात्र या भागात वाढलेले अतिक्रमणामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होते. त्यासाठी हे सर्कल कमी करुन चौकात हजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा बसवली जात आहे. मात्र हे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. या भागात वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. सारडा सर्कल पर्यंत या रांगा लागलेल्या असतात.
त्यामुळे आमदार देवयानी फरांदे व छगन भुजबळ या दोघांनीही या प्रश्नात लक्ष घातलं. सुरुवातीला फरांदे यांनी महापालिकेत बैठक घेतली व अतिक्रमण हटवण्याची मागणी. त्यांनी चक्क रस्त्यावर उतरत यांसदर्भात पोलिसांना देखील समज दिली. मात्र तरीही महापालिकेकडून त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र भुजबळांनी अधिकाऱ्यांना खडसावल्यानंतर व आंदोलनाचा इशारा देताच महापालिका अॅक्शन मोडवर आली. महापालिकेने व पोलिस प्रशासनाने संयुक्तरित्या तत्काळ येथील अतिक्रमणावर हातोडा चालवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.