Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News : येवलेकरांच्या भाळी चौथ्यांदा लाल दिवा!

भुजबळ समर्थकांना लागली रविवारची मंत्रिपदाची बंपर लॉटरी!

Sampat Devgire

संतोष विंचू

Yeola News : आता २०२४ मध्येच राजकीय स्थित्यंतरे होतील आणि येवलेकरांच्या नशिबी पुन्हा लाल दिवा लाभेल...अशी सर्वस्तरातूनच काय कोणालाही वाटले नव्हते. तशी अपेक्षा देखील कालपर्यंत कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र आज रविवारची बंपर लॉटरी येवलेकरांना लागली, अशी भावना भुजबळ समर्थकांत आहे. (Chhagan Bhujbal supporters feels a bumper lottory through Ministerial Post)

आज राज्याला (Maharashtra) जो राजकीय भूकंपाचा धक्का बसला त्याची तीव्रता येवल्यापर्यंतही (Yeola) पोहोचली आहे. अर्थात ही तीव्रता मतदारांना वेगळी असली तरीही छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) समर्थकांना ती आनंददायी व स्वागतार्ह वाटली आहे.

त्याचे कारण येथील आमदार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या रूपाने पुन्हा एकदा अर्थात चौथ्यांदा येवला मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपदाचा लाल दिवा लाभला आहे.

राज्याच्या सत्ता समीकरणात घडलेल्या बदलांमुळे अचानकपणे येवलेकरांच्या नशिबी लाल दिवा आला आहे. यामुळे २०१४ ते २०१९ पर्यत व त्यानंतर मागील एक वर्षात येथील रखडलेला विकास व प्रलंबित असलेले छोटे-मोठे प्रकल्प पूर्णत्वास जाण्याचा आशावाद जागा झाला आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या माध्यमातून चौथ्यादा जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच २००४ मध्ये येवल्याला लाल दिवा आणि मंत्रीपदाचा स्वप्न भुजबळांच्या माध्यमातूनच पूर्ण झालं होतं. त्यानंतर दहा वर्ष म्हणजे २०१५ पर्यत येवलेकर सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाच्या माध्यमातून झालेला बदल पहात होते. या दहा वर्षात हजार कोटीवर निधी आनत भुजबळ यांनी येथील रूप बदललं परंतु २०१४ मध्ये सत्तांतर झाले आणि भुजबळही अडचणीत आल्याने पाच वर्षात येथील विकासाला पूर्णतः ब्रेक लागला होता. २०१९ च्या निवडणुकीत तर राष्ट्रवादीची सत्ता आणि भुजबळांना मंत्रिपद हे दिवास्वप्नच वाटत होते.

परंतु निकालानंतर राजकीय चित्र बदलले अन सर्वकाही चक्रे उलटी फिरली जेवलेला पुन्हा मंत्रीपद लाभले अर्थात कोरोनामुळे सुरुवातीच्या दीड दोन वर्षात विकास कामाला अनेक मर्यादा आल्या होत्या आता पुन्हा एकदा म्हणजे चौथ्यांदा येवल्याच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद आले आहे.

याचा फायदा नक्कीच मतदार संघाच्या विकासाला होणार आहे. किंबहुना लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गे लागतील.भुजबळांच्या माध्यमातून मोठा निधी मतदार संघाला येऊ शकणार आहे, असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT