Chhagan Bhujbal & Jayant Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांना वाटते की, पुन्हा एकदा राज्यात...

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष त्यासाठी तयारीला लागले आहेत. यामध्ये सत्ताधारी महायुतीतील नेत्यांची धाकधूक लपून राहिलेली नाही.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार संवादात त्यांनी महायुतीच्या नेत्यांची चांगलीच पोलखोल केली. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात हमखास सत्तांतर होणार आहे.

महायुतीची सत्ता जाणार आहे. महाविकास आघाडीचे सरकारी येईल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या संदर्भात भुजबळ यांनी अतिशय सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, यासंदर्भात मी काही बोलण्याची गरज नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेष की अन्य काही, हे लवकरच समजेल. घोडा मैदान समोरच आहे. निकाल लागेल. या शब्दात त्यांनी जयंत पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.

मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टीका केली. ते म्हणाले, लाडके बहीण योजनेबाबत सुरुवातीला विरोधक म्हणत होते. ही योजना प्रत्यक्षात येणारच नाही. योजनेसाठी पैसे कुठून आणणार अनंत अडचणी सांगितल्या जात होत्या.

आता प्रत्यक्षात कार्यवाही झाली. महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. थोडक्यात विरोधकांच्या सर्व आरोपांतील हवा निघून गेली आहे.

नाशिकची प्रतिमा बिघडवू नका

दोन दिवसांपूर्वी सकल हिंदू समाजातर्फे नाशिक मध्ये बंद पुकारण्यात आला. यावेळी दुकाने बंद करण्यावरून वाद झाला. सकल हिंदु समाजाच्या अती उत्साही कार्यकर्त्यांनी परवानगी नसलेल्या भागात रॅली काढली. यावरून तणाव वाढला. शहरात दंगल झाली. याबाबत भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, नाशिक शहराची एक चांगली प्रतिमा आहे. हे शहर शांत आहे. काही वाद झाल्यास दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन शांततेचे आवाहन करण्याची परंपरा आहे. हे वातावरण कोणीही बिघडवू नये. अन्यथा भविष्यात येथे नवे प्रकल्प येणार नाहीत.

छोटेसे दुकान जरी असले तरी वातावरण संवाद पूर्ण असले तरच व्यापार उदीमाचा विकास होतो. दंगल अथवा अशांततेमुळे शहराचा विकास खुंटतो. हे सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे. दोन्ही समाजांनी शांतता ठेवली तर शहराचा निश्चित विकास होईल. अन्यथा या विकासामध्ये अडथळे आल्याशिवाय राहणार नाहीत. पोलिसांनी या संदर्भात परिश्रम घेऊन वातावरण निवळले. त्यासाठी त्यांनी पोलीस यंत्रणेचेही कौतुक केले.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT