Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal On Pravin Darekar : 'आधी मनुस्मृती जाळा' भुजबळांनी दरेकरांना फटकारले

Jitendra Awhad support Issue :आव्हाड यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यामुळे सध्या या प्रश्नावरून चांगलेच राजकारण तापले आहे.

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत भाजप आंदोलन करीत आहे. आव्हाड यांच्याकडून महाड येथे अनावधानाने आंबेडकरांच्या छायाचित्राचे नुकसान झाले होते. त्यानंतर आव्हाड यांच्या बाबत भारतीय जनता पक्षाने काल राज्यभर आंदोलन केले. आव्हाड यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यामुळे सध्या या प्रश्नावरून चांगलेच राजकारण तापले आहे.

या संदर्भात छगन भुजबळ यांनी आव्हाड यांची बाजू घेतली होती. आव्हाड यांची भूमिका आणि हेतू लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे यांच्यावर टीका करून मूळ प्रश्नांकडून दूर जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी भुजबळ यांची भूमिका दुर्दैवी आहे. त्यांनी असे करायला नको होते. असे म्हटले होते. यासंदर्भात भुजबळ यांनी आपली परखड प्रतिक्रिया दिली आहे

'दरेकर यांना काय म्हणायचे ते म्हणू द्या. मी त्याला महत्त्व देत नाही. राजकारणासाठी राजकारण करू नका. आधी मनुस्मृती जाळा. मग पुढे बोला. मनुस्मृती कुठल्याही परिस्थितीत शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होता कामा नये. त्याला आमचा सदैव विरोध राहील', या शब्दात भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दरेकर यांना फटकारले आहे.

आम्ही फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारे कार्यकर्ते आहोत. या विचारधारेचे आम्ही सतत समर्थन केले आहे. जेव्हा वाटले, तेव्हा परखडपणे स्पष्ट बोललो आहे. यापुढेही बोलत राहणार. मनुस्मृती जाळा ही आमची भूमिका आहे. ती कायम राहील. मूळ प्रश्नापासून कोणीही दूर जाऊ नये, असेही त्यांनी भाजप नेत्यांना सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT