Hasan Mushrif On Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये जुंपली; मुश्रीफांच्या 'कर्णवेध'वर भुजबळ 'रिअ‍ॅक्ट' होणार?

Hasan Mushrif : मनुस्मृतीचा मुद्दा कुठेतरी बाजूला पडेल म्हणून, पाठिंबा देण्याचे वक्तव्य करणे हे अतिशय दुर्दैवी आहे, अशा शब्दात हसन मुश्रीफ यांनी छगन भुजबळ यांना सुनावले आहे.
Hasan Mushrif, Chhagan Bhujbal
Hasan Mushrif, Chhagan Bhujbalsarkarnama
Published on
Updated on

Hasan Mushrif V/S Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांमध्ये राजकीय जुगलबंदी जुंपण्याची शक्यता आहे.आमदार जितेंद्र आव्हाड यांची बाजू घेण्यावरून मंत्री छगन भुजबळ यांचा पक्षातील नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी 'कर्णवेध' घेतला. छगन भुजबळ कशापद्धतीने यावर 'रिअ‍ॅक्ट' होतात, याची आता राजकीय उत्सुकता आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची बाजू घेतल्याचे मंत्री हसन मुश्रीफांना रुचलेलं नाही. मनुस्मृतीचा मुद्दा कुठेतरी बाजूला पडेल म्हणून, पाठिंबा देण्याचे वक्तव्य करणे हे अतिशय दुर्दैवी आहे, अशा शब्दात हसन मुश्रीफ यांनी छगन भुजबळ यांना सुनावले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याने दुसऱ्या ज्येष्ठ नेत्याला, अशा पद्धतीने सुनावण्याची ही पहिलीच वेळ आहे. मनुस्मृतीच्या चित्रावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा छापलेलं पोस्टर फाडणं ही गोष्ट निंदनीयच असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्यसभेवर जाणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी, यांसदर्भात नेते अजितदादा निर्णय घेतील. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे कुटुंबासह परदेशी दौऱ्यावर असून, लवकरच ते कामात रुजू होणार आहेत. तसेच दुष्काळी कामासंदर्भात निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाने सूट दिली पाहिजे, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

Hasan Mushrif, Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Displeased : महायुतीमध्ये छगन भुजबळ नाराज, विधानसभेपूर्वी धोक्याची घंटा?

लोकसभा निवडणुकीनंतर महायुती टिकणार आहे. लोकसभेला पक्षाला कमी झाल्या मिळाल्या, मात्र विधानसभेला तसं होऊ नये यासाठी आत्ताच पक्षातील नेते मंडळींनी अलर्ट रहायला पाहिजे. लोकसभेचा निकाल लागेपर्यंत सर्व पक्ष आणि त्यांचे उमेदवार विजय होणार असल्याचे सांगत आहे. निकाल लागल्यांतर सर्व काही स्पष्ट होईल. आपण निकालाची वाट पाहत असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

Hasan Mushrif, Chhagan Bhujbal
Bhujbal Warning to BJP : भुजबळांनी टोचले भाजपचे कान; विधानसभा निवडणुकीतील संभाव्य धोकाही सांगितला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com