Chhagan Bhujbal  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Video Chhagan Bhujbal : छगन भुजबळही आता विरोधकाच्या भूमिकेत??

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News: राजकोट मालवण किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी वातावरण शांत होण्याची चिन्हे नाहीत. यावर अद्यापही विरोधी पक्ष आक्रमक आहे. शासनाकडूनही विविध निर्णय घेतले जात आहेत.

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे आज निषेध आंदोलन केले जात आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्याची माफी मागितली आहे. या पार्श्वभूमीवर आज होणारे आंदोलन चर्चेचा विषय आहे.

या संदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनी नाशिक येथे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, पुतळा पडणं ही अतिशय दुर्दैवी आणि मनाला दु:ख देणारी ही घटना आहे, बसविण्याच्या प्रक्रियेत अनेक निकष आहेत.

कोणी हलगर्जीपणा केला हे सर्व हळू हळू बाहेर येईल. शासनाने याबाबत पूर्वीपासून अतिशय कडक नियम केले आहेत. पुतळा कसा दिसला पाहिजे, कसा असला पाहिजे, अनेक विभागांकडून परवानगी घ्याव्या लागतात.

तरी अशा गोष्टी घडतात. याचा सगळ्यांनाच खेद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आज होणारे आंदोलन हे दुःख व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून होत आहे. या विषयावर सगळ्यांच्याच भावना अतिशय तीव्र आहेत.

पुतळा बसवण्यासंदर्भात कला संचालनालयाची देखील परवानगी घ्यावी लागते. सार्वजनिक बांधकाम विभागाची देखील या संदर्भात भूमिका असते. तरीही हे घडले, हे मान्य करावेच लागेल. एकंदरच यामध्ये काहीतरी गफलत तर झाली आहे, हे मात्र नक्की. हलगर्जीपणा केला हे सर्व हळू हळू बाहेर येईल, असा माझा विश्वास आहे.

मालवण येथील घटनेबाबत विरोधी पक्ष आक्रमक आहे. शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसह काल येथे भेट दिली होती. त्या भेटीवरून भाजपने ते नारायण राणे समर्थक आणि शिवसेना समर्थकांमध्ये चांगलाच राडा देखील झाला होता.

महाविकास आघाडीचे घटक पक्ष राज्यभर विविध शहरांमध्ये या प्रकरणावरून निषेध आंदोलन करीत आहे. याबाबत राज्य शासनावर अनेक आक्षेप घेण्यात येत आहेत. लवकरच एक राज्यव्यापी आंदोलन करण्याची घोषणा विरोधी पक्षाने केली आहे.

या स्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या प्रकरणी जनतेची माफी मागितली आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे या विषयावर खेद व्यक्त करण्यात आला. राज्यातील जनतेच्या भावना अतिशय तीव्र आहे.

त्यामुळे आणखी काही दिवस हे प्रकरण गाजण्याची चिन्हे आहेत. त्यात मंत्री भुजबळ यांनी या प्रकरणात काहीतरी गफलत झाल्याचे विधान केले आहे. त्यामुळे याबाबतचे चौकशीत काय पुढे येते याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT