Hasan mushrif- chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Politics: भुजबळांचा मुश्रीफांना टोमणा, म्हणाले 'ते' ज्येष्ठ त्यांचं ऐकलं पाहिजे!

Jitendra Awhad politics, Bhujbal firms on Awhad issue : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ जितेंद्र आव्हाड यांना दिलेल्या पाठिंब्याबाबत ठाम...

Sampat Devgire

Bhujbal On Hassan Mushrif : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांना पाठिंबा दिला आहे. त्यावरून आता भाजप पाठोपाठ त्यांच्याच पक्षातील सहकारी व मंत्री मुश्रीफ यांनीही यावर प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली होती.मनुस्मृतीचा विषय बाजूला पडेल म्हणून आव्हाड यांना पाठिंबा देणे कदापिही समर्थनीय नाही,असे मुश्रीफ म्हणाले होते.

यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील भुजबळ यांच्यावर टीका करत त्यांना सुनावले होते. मनुस्मृतीचा विषय बाजूला पडेल म्हणून आव्हाड यांना पाठिंबा देणे योग्य नाही, असे मुश्रीफ म्हणाले होते. मुश्रीफ यांनी केलेल्या टीकेला आता भुजबळ यांनी उत्तर दिले आहे. आपल्या खास शैलीत भुजबळ म्हणाले, मुश्रीफ ज्येष्ठ आहेत. त्यामुळे त्यांचे ऐकले पाहिजे. या एका वाक्यात त्यांनी हा विषय संपवून टाकला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या विरोधात सुरू असलेल्या राजकीय आंदोलनावर राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडत आमदार आव्हाड यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. आव्हाड यांच्याकडून हा प्रकार कधी घडला याबाबत भूमिका लक्षात घ्यावी, असे भुजबळ यांनी म्हटले होते. भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेवर भाजपच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

भुजबळ यांनी दिलेल्या पाठींब्यावर त्यांच्याच पक्षाच्या इतर नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, मनुस्मृति या विषयावर मी काय बोलावे, हे मी चांगल्या प्रकारे जाणतो. माझ्या पक्षाच्या बैठकीत मी याबाबत माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. माझ्या पक्षाच्या बैठकीत भूमिका मांडण्याबाबत मला अधिकार आहे. याविषयी कोणाला काही आक्षेप असेल तर तो असू शकतो. असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. त्यांच्याच पक्षाचे मंत्री मुश्रीफ यांच्या विषयी मात्र अधिक बोलण्यास छगन भुजबळ यांनी नकार दिला.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT