Ravindra Dhangekar On Hasan Mushrif : 'सत्तेसाठी शरद पवारांना सोडलं' धंगेकरांनी मुश्रीफांना डिवचलं

Hasan Mushrif Sharad Pawar : सगळ्याच विभागात भ्रष्टाचार होत आहे. महसूल असो किंवा गृहखाते असो हे महाराष्ट्राला लुटायला निघाले आहेत. असा घणाघातही आमदार धंगेकर यांनी केला.
Ravindra Dhangekar Hasan Mushrif
Ravindra Dhangekar Hasan Mushrif sarkarnama
Published on
Updated on

Ravindra Dhangekar News : ससून रुग्णालायतील दोन डाॅक्टर हसन मुश्रीफांच्या आशीर्वादाने काम करत असल्याचा आरोप धंगेकरांनी केला होता. माफी मागितली नाही तर धंगेकरांच्या विरोधात बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचे प्रतिआव्हान मुश्रीफांनी दिले होतं. मात्र, कोल्हापूरमध्ये येऊन धंगेकरांनी 'सत्तेपायी वडिलांसारख्या शरद पवार यांना सोडून जाणाऱ्या मुश्रीफ यांनी धमकी देऊ नये.' असे म्हणत मुश्रीफांना डिवचले आहे.

'ललित पाटील प्रकरणी देखील मी हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मी कुणाची माफी मागणारा कार्यकर्ता नाही. धंगेकर Ravindra Dhangekar हा घाबरणारा माणूस नाही'. या शब्दात धांगेकर यांनी मुश्रीफ यांना सुनावले. मी पुणेकर आहे. घाबरणारा नाही. 4 तारखेनंतर मी विधानसभेत नसेन तर लोकसभेत असेन, असे धंगेकरांनी ठणकावले.

तानाजी सावंत Tanaji Sawant हा भ्रष्टाचारी माणूस आहे. सगळ्याच विभागात भ्रष्टाचार होत आहे. महसूल असो किंवा गृहखाते असो हे महाराष्ट्राला लुटायला निघाले आहेत. असा घणाघात ही आमदार धंगेकर यांनी केला.

Ravindra Dhangekar Hasan Mushrif
Lok Sabha Election 2024 : पोलिसांच्या 'या' आदेशामुळे विजयानंतरही कार्यकर्त्यांचा हिरमोड होणार; कारण काय?

तावरेला भर चौकात फाशी द्या

डाॅ. अजय तावरे यांनी अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पुण्याचं रक्त पिवून मोठं होणाऱ्या तावरेला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे. पोलीस सुपाऱ्या घेऊन काम करत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे धंगेकर म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

...तर जेलमध्ये जाईल

पुण्यातील पब संस्कृती बंद केली पाहिजे. पब बंद होणार नसतील तर मी कुणाची माफी मागणार नाही. असे हसन मुश्रीफ आणि शंभूराज देसाई यांना ठणकावताना जेलमध्ये जाण्याच्या तयारी धंगेकर यांनी दाखवली. मी गरीब कार्यकर्ता आहे. माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करत पैसे मागितले तर माझ्याकडे पैसे नाहीत. मी जेलमध्ये जाईल, असे धंगेकर म्हणाले.

(Edited By Rosan More)

Ravindra Dhangekar Hasan Mushrif
Nana Patole Beed Tour : दुष्काळाची दाहकता पाहायला पटोले बीडमध्ये आले; पण मुख्यमंत्री, कृषिमंंत्री ‘नॉट रिचेबल’ झाले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com