Devendra Phadanvis & Manoj Jarange Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange Patil politics: जरांगेंचा गंभीर आरोप... फडणवीस भुजबळांना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत!

Chhagan Bhujbal politics, Jarange Patil appeal Community to defeat Bhujbal in upcoming election-मराठा समाजाला आरक्षण विरोधी छगन भुजबळ यांना मनोज जरांगे पाटील यांनी चांगलेच फटकारले

Sampat Devgire

Jarange Patil Vs Bhujbal: मराठा आरक्षणाचे नेते जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप आज येथे झाला. त्या रॅलीत जरांगे पाटील यांनी आरक्षणाबाबत राज्य सरकारवर गंभीर आरोप केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांना टिकेचे लक्ष्य केले.

अपेक्षेप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी आजच्या आपल्या भाषणात मंत्री छगन भुजबळ यांना टार्गेट केले. उपस्थित आंकडूनही त्यावर टाळ्या आणि घोषणांचा प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे एकंदरच शांतता रॅलीचा समारोप छगन भुजबळांचा समाचार घेण्यासाठीच होता असे चित्र निर्माण झाले.

जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच महायुतीच्या विविध नेत्यांचा उल्लेख करून केली. आमदार प्रविण दरेकर, आमदार आशिष शेलार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांसह विविध नेत्यांचा समाचार त्यांनी घेतला. मंत्री छगन भुजबळ त्यांनी एकेरी उल्लेख करीत, आम्हाला आडवा येतो, तो शिल्लक रहात नाही, असे ते बोलले.

आज येथे उपस्थित असलेला समाज हा गोरगरीब आणि गरजवंत आहे. त्याला आरक्षणाची गरज आहे. आरक्षणावर त्याचे भविष्य अवलंबून आहे. मात्र आरक्षणाच्या प्रश्नावर राजकारण आणि स्वतःचा लाभ करणाऱ्या नेत्यांना त्याची जाणीव होणार नाही. अशावेळी समाजाने जागृत झाले पाहिजे.

ते पुढे म्हणाले, आम्ही सातत्याने शांततेत आंदोलन करतो. सत्ताधाऱ्यांनी डिवचल्यावरही आम्ही संयम सोडलेला नाही. मात्र सत्ताधारी आपल्या कृत्यांपासून बाजूला होण्यास तयार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक नेते माझ्यामागे सोडण्यात आले.

हे नेते सातत्याने माझ्यावर आरोप करीत असतात. मात्र त्याने काहीच फरक पडणार नाही. जो माझ्यावर आरोप करील मराठा आरक्षणाला आडवा येईल, समाज त्याचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही

समाजाने आणि कार्यकर्त्यांनी देखील कोणी कितीही डिवचले, काहीही केले तरी, शांत रहावे. संयम सोडू नये. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना राज्यात शांतता नको आहे. त्यांना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

या दंगलींतून त्यांना त्यांचे राजकारण साध्य करायचे आहे. मराठा समाजाला आरक्षण देणे टाळायचे आहे. त्यामुळे आपण अतिशय सावधपणे आणि काळजीपूर्वक यापुढील वाटचाल करायची आहे.

छगन भुजबळ हे सातत्याने आपल्याला आव्हान देत असतात. राज्यात २८८ जागा लढवून दाखवाव्यात. राज्यात आठ जागा तरी निवडून आणाव्यात, अशी विधाने ते करीत आहेत. मात्र ही विधाने करणे त्यांनी थांबवावे. महाराष्ट्रात सोडा त्यांच्या नाशिक जिल्ह्यातच त्यांचे आमदार निवडून येतात का, याची काळजी त्यांनी करावी. येत्या निवडणुकीत छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघातून पाडा. त्याचे राजकारण संपवा, असा इशाराच त्यांनी दिला.

जरांगे पाटलांच्या नादी लागल्यावर ओबीसी नेते भुजबळ यांनी आज आपली अवस्था काय झाली आहे, याचे अवलोकन करावे. लोकसभा निवडणुकीत त्यांना घरातच अडकून पडावे लागले. राज्यातील एकही नेत्याने त्यांना प्रचाराला बोलवले नाही.

हा संदेश त्यांनी नीट घेतलेला दिसत नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा कार्यक्रम होईल. भुजबळ यांना पराभवापासून कोणीही वाचवू शकणार नाही असा दावा त्यांनी केला.

यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना देखील सजग केले. आरक्षणाच्या लढ्यात खंबीरपणे पुढे यावे. पक्ष आणि नेत्यांसाठी जगणे आणि लढणे बंद करावे. नेत्यांना मोठे करून समाजातील गोरगरिबांचे कल्याण होणार नाही. आपल्या मुलांच्या डोळ्यातले अश्रू काय सांगतात, हे पहावे.

गेल्या ७५ वर्षात आपण नेते आणि पक्षांनाच मोठे करत आलो आहोत. या नेत्यांनी आपल्या चार पिढ्यांचे कल्याण केले. यावेळी जरा जातीचा लढा लढू या. जातीला मोठे करूया. त्यामुळे जातीतील आणि समाजातील गोरगरीब जनतेचे कल्याण होणार असेल तर, तुम्हाला नको आहे का? असा प्रश्न त्यांनी केला.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT