Eknath Shinde Convoy Accident : मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्याला अपघात; चार वाहनं एकमेकांवर आदळली

Jalgaon Mahayuti Melava News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मेळाव्याच्या ठिकाणी जात असतानाच विमानतळ परिसरातच त्यांच्या वाहनांच्या ताफ्याचा अपघात झाला.या अपघातात ताफ्यातील चार वाहनं एकमेकांवर आदळली.
CM Eknath Shinde Convoy Accident.jpg
CM Eknath Shinde Convoy Accident.jpgSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं कडवं आव्हान परतवून लावण्यासाठी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाललेल्या महायुतीने आता विधानसभेसाठी नो रिस्क भूमिका घेत जंग जंग पछाडले आहेत.

महायुतीतील भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ताफ्याला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

जळगावात महायुतीच्यावतीने भव्य मेळावा मंगळवारी(ता.13)आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ,उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही जळगाव विमानतळावर दाखल झाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मेळाव्याच्या ठिकाणी जात असतानाच विमानतळ परिसरातच त्यांच्या वाहनांच्या ताफ्याचा अपघात झाला.या अपघातात ताफ्यातील चार वाहनं एकमेकांवर आदळली.मात्र,या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर जखमी झाले नसल्याची माहिती समोर येत आहे.

CM Eknath Shinde Convoy Accident.jpg
Ajit Pawar : 'सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं'; अजितदादांना मोठी खंत

या अपघातात मुख्यमंत्र्‍यांच्या ताफ्यातील चार वाहनं एकमेकांवर आदळल्यानं गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.अपघाताच्या घटनेनंतर पुढे काही वेळातच मुख्यमंत्र्यांचा ताफा कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना झाला.वाहनांच्या ताफ्यातील इतर वाहनांमधून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री सभास्थळी दाखल झाले.

CM Eknath Shinde Convoy Accident.jpg
Shiv Swarajya Yatra : सोलापूरमध्ये नाराजीनाट्य; व्यासपीठावर स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादीचा नेता शिवस्वराज्य यात्रा सोडून गेला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com