Chhagan Bhujbal, Raj Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : शिवसेना सोडल्यावर १२ वर्ष कुणाशी बोललो नाही पण..; भुजबळांनी सांगितला शिवसेना फुटीचा जुना किस्सा

Chhagan Bhujbal recounting the political episode when Raj Thackeray exited Shiv Sena : भुजबळ म्हणाले, शिवसेना सोडली तेव्हा बारा वर्ष मी कुणाशीच बोललो नव्हतो. पण मला जेव्हा कळलं की राज ठाकरे हे शिवसेना सोडत आहेत. तेव्हा मी त्यांना फोन केला होता.

Ganesh Sonawane

Maharashtra politics | मनसे प्रमुख राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही भाऊ एकत्र येण्याच्या सुरु असलेल्या चर्चांणा राज्यात उधाण आलं आहे. विविध पक्षातील राजकीय नेत्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरून शिवसेनेमधूनच आपला राजकीय प्रवास सुरु केलेल्या छगन भुजबळांनीही आता त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

भुजबळ म्हणाले, शिवसेना सोडली तेव्हा बारा वर्ष मी कुणाशीच बोललो नव्हतो. पण मला जेव्हा कळलं की राज ठाकरे हे शिवसेना सोडत आहेत. तेव्हा मी स्वत:हुन राज ठाकरे व उद्धव ठाकरे या दोघांनाही फोन करुन सल्ला दिला होता व तो त्यांनी ऐकला होता. मी सांगितले की, माझे ऐका आठ दिवस शांत राहा. त्याप्रमाणे ते राहिले. पण, दुर्दैवाने जे व्हायचं तेच झालं.

दोघे भाऊ एकत्र येत आहेत त्यावर विचारले असता भुजबळ म्हणाले, मला तर खूप आनंद होईल. बाळासाहेब असतानाच मी शिवसेनेतून बाहेर पडलो होतो. पण, मी जरी आज वेगळ्या पक्षात असलो तरी देखील शिवसेनेबद्दलचे माझे प्रेम कमी झालेले नाही. राजकारण आणि कुटुंब या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्या पाहीजे. सगळीच कुटुंब एकत्र आली तर फार बरं होईल असे भुजबळ म्हणाले.

दरम्यान दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर काय परिणाम होईल असे विचारले असता भुजबळ म्हणाले नक्कीच दोघे भाऊ एकत्र आल्यास शिवसेनेची शक्ती वाढेल. त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा परिणाम होईल. साधारण कार्यकर्ते जरी एकत्र आले तरी पक्षाची शक्ती वाढते. मग हे दोन्ही नेते तर वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख आहेत, त्यामुळे निश्चितच शक्ती वाढेल असं भुजबळ म्हणाले.

भुजबळ समर्थकांची नाशिकमध्ये बॅनरबाजी

दरम्यान छगन भुजबळ सध्या राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात आहेत. मंत्रिपदापासून डावलण्यात आल्याने ते नाराज आहेत. अजित पवार यांच्या आजच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थकांनी केलेली बॅनरबाजी चर्चेचा विषय ठरली. छगन भुजबळ यांना सन्मानाने पुन्हा मंत्रिमंडळात घ्या अशा मागणीचे बॅनर लावण्यात आले होते. मात्र, अजित पवार यांचा नाशिक दौरा रद्द झाल्याने भुजबळ समर्थकांची निराशा झाली. यासंदर्भात बोलताना, कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी बॅनर लावले. त्याचा काही फारसा परिणाम होता असे नाही. हा विषय अजित पवार यांच्यावर सोपविल्याचे भुजबळांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT