Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Panel In Yeola: शिवसेनेला सोबत घेत भुजबळांचे पॅनल जाहीर!

Yeola APMC Election: येवला बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संभाजीराजेंना झुकते माप

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या येवला मतदारसंघातील बाजार समिती निवडणुकीसाठी शेतकरी विकास पॅनल जाहीर केले आहे. त्यात शिवसेनेचा समावेष करण्यात आला आहे. मात्र काँग्रेस फारसे आग्रही नसल्याने त्यांचे उमेदवार नाहीत. पॅनल जाहीर झाल्याने विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. (Yeola APMC election may be one side for Chhagan Bhujbal)

दरम्यान १८ जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या संपर्क कार्यालयातून हे पॅनल जाहीर झाले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अंबादास बनकर, शिवसेनेचे (Shivsena) संपर्क नेते संभाजी पवार यांचाही समावेष आहे. त्यामुळे एका अर्थाने हे शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतरचे हे महाविकास आघाडीचे पॅनल आहे.

सोसायटी गटाचे उमेदवार

येवला बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या शेतकरी विकास पॅनलची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सोसायटी सर्वसाधारण गटात संजय अंबादास बनकर, किसनराव धनगे, मोहन शेलार, संजय पगार, अल्केश कासलीवाल, सविता पवार आणि रतन बोरणारे, महिला राखीव गटात लता भास्कर गायकवाड आणि पुष्पा केविदास शेळके, ओबीसी (सोसायटी) वसंतराव पवार, भटके विमुक्त (सोसायटी) कांतीलाल साखरचंद साळवे,

ग्रामपंचयात गटाचे उमेदवार

ग्रामपंचायत मतदारसंघातून सर्वसाधारण जागेसाठी ज्ञानेश्वर भास्कर दराडे, बापु वामन गायकवाड, आर्थिक दुर्बल घटक- सचिन नवनाथ आहेर, अ. जा., जमाती- संध्या बापुराव पगारे. व्यापारी व आडते मतदारसंघ - नंदकिशोर रामनारायण अट्टल, सुरेश नंदलाल अट्टल, हमाल व तोलारी मतदारसंघ- गोऱख निवृत्ती सुरासे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ, अंबादास बनकर, दिलीप खैरे आणि शिवसेनेचे संपर्क नेते संभाजी पवार या पॅनलच्या निर्मिती प्रक्रीयेत होते. या पॅनेलचा प्रचार यापुर्वीच सुरु झाला आहे. आता पॅनेलचे उमेदवार जाहीर झाल्याने उमेदवारांकडून अडचणीच्या उमेदवारांच्या माघारीसाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचबरोबर शिवसेनेसह अन्य नेत्यांनी एकत्र येत विरोधात पॅनल करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या पॅनलच्या उमेदवारांबाबत उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT