Chhagan Bhujbal & Babanrao Gholap Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhujbal v/s Gholap Politics : बबनराव घोलप यांच्या तोंडी निष्ठेची भाषा शोभत नाही!

Sampat Devgire

Shivsena-NCP Politics : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा गतवर्षीच शिवसेनेत प्रवेश होणार होता. शिवसेना नेते बबन घोलप यांच्या आरोपाला भुजबळ यांनीही त्याच भाषेत उत्तर दिले आहे. निष्ठेची भाषा घोलप यांच्या तोंडी शोभत नाही, अशी टीका भुजबळ यांनी केली आहे. (Political debate has not stopped in Baban Gholap & Chhagan Bhujbal)

शिवसेनेचे (Shivsena) उपनेते बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) (अजित पवार) (Ajit Pawar) मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याबाबत विधान केले होते. त्याला भुजबळ यांनी उत्तर दिल्याने हा राजकीय वाद थांबण्याची चिन्हे नाहीत.

यासंदर्भात बाेलताना शिवसेनेतून १९९१ ला जे फुटले त्या यादीत माजी मंत्री बबनराव घोलप यांचे नाव वरच्या क्रमांकावर होते. त्यामुळे घोलप यांनी निष्ठेविषयी बोलू नये, अशी टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केली.

ते माध्यमांशी बोलत होते. भुजबळ वर्षापूर्वीच शिवसेनेत प्रवेश करणार होते. मात्र, दिल्लीतून मुंबईला येऊन त्यांचा शिवसेना प्रवेश रोखला गेला, असा दावा घोलप यांनी केला होता.

त्याअनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर भुजबळ म्हणाले की, मी आणि माझी मूलं आम्ही कधीही आम्हाला शिवसेनेत प्रवेश करायचा आहे, असे कुणालाही म्हटलेलं नाही. कुणाकडे आम्ही गेलोही नाही. मधले कार्यकर्ते चर्चा करीत असतील तर मला माहीत नाही.

कारण नसताना घोलप यांनी विषय काढला आहे. त्यांना शिवसेना सोडून जायचे आहे, त्यांनी जावं, पण इतरांना निष्ठेची भाषा शिकवू नये. १९९१ ला शिवसेनेतून काँग्रेसमध्ये जाण्यासाठी ज्या शिवसेनेच्या ३६ आमदारांच्या सह्या केल्या होत्या, त्यात सगळ्यात वर बबन घोलप यांची सही होती. त्यामुळे बबन घोलप यांनी निष्ठेची भाषा करू नये, असा टोमणा मारला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT