NDCC Bank News : नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासकांनी राजीनामा दिला आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वसुलीला तीन महिन्यांची स्थगिती दिल्याने ही परिस्थिती ओढवल्याची टीका होत आहे. जिल्हा बँकेच्या अडचणी वाढल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कोणत्याही स्थितीत जिल्हा बँक वाचली पाहिजे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा उल्लेख टाळत, राजकीय नेत्यांनी आपले लहान फायदे बाजूला ठेवले पाहिजेत. या बँक कशी वाचेल याचाच विचार केला पाहिजे असा टोला त्यांनी लगावला.
जिल्हा बँके संदर्भात एक वर्षांपूर्वी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्यात बँकेवर प्रशासक नियुक्त करावा. प्रशासकाने प्रभावी कामकाज करून आर्थिक अडचणीतून बँकेला बाहेर काढावे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे ठरले होते.
या संदर्भात पहिल्या प्रशासकाला प्रभावी कामकाज जमले नाही. त्यामुळे दुसरे प्रशासक नियुक्त झाले. आता तिसरे प्रशासकांनीही राजीनामा दिला आहे. ज्या पद्धतीने वसुलीला स्थगिती देण्यात आली. व्याज माफ करावे अशी सूचना करण्यात आली. वसुलीच्या कामकाजात अडथळे आले. त्यामुळे आपण आपले टार्गेट पूर्ण करू शकणार नाही असे प्रशासकांचे मत आहे. त्यातूनच त्यांनी हा राजीनामा दिला आहे.
अलीकडे राजकीय नेत्यांनी काही भूमिका घेतल्या. वसुली थांबवा अशा सूचना केल्या. त्यामुळे बँकेच्या कामकाजात समस्या निर्माण झाल्या आहेत. ही बँक बुडाली तर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी काही थोडे फायदे बाजूला ठेवावे आणि फक्त शेतकऱ्यांचा विचार करावा, असा सल्ला भुजबळ यांनी दिला.
माजी उपमुख्यमंत्री भुजबळ म्हणाले, या सर्व परिस्थितीत आपल्याला बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करता येत नसतील. अशा स्थितीत राज्य शासनाने ८०० ते ९०० कोटी रुपयांचा निधी बँकेला द्यावा. तरच रिझर्व बँकेच्या निर्बंधातून नाशिक जिल्हा बँक वाचू शकेल.
जिल्हा बँक सध्या आर्थिक अडचणीत सापडली आहे. या संदर्भात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन तीन महिने कर्ज वसुलीला स्थगिती देण्याच्या आदेश दिले होते. आता मंत्रालयात झालेल्या बैठकीत व्याज वसुलीला सक्ती करू नये असे म्हटले होते. त्यामुळे जिल्हा बँकेचा पाय आणखी खोलात गेला आहे. यावर भुजबळ यांनी कोकाटे यांना अप्रत्यक्षरीत्या खडसावले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.