Nashik News : पहलगाम हल्ल्यानंतर भीतीचे सावट, नाशिकमधील काश्मिरी नागरिक झाले गायब

Pahalgam Attack Impact, Kashmiri citizens leave Nashik : नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ ओढावू शकते, आपण नागरिकांच्या रोषाचे शिकार होऊ नये या भीतीने त्यांनी शहर सोडले असावे असा अंदाज स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
Kashmiri citizens leave Nashik,
Kashmiri citizens leave Nashik,Sarkarnama
Published on
Updated on

Pahalgam impact Nashik : पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत अनेक महत्वाचे निर्णय घेतले. देशभरात या हल्ल्यानंतर संतापाची लाट असून या हल्ल्याचा बदला घेतला जावा अशी प्रत्येक भारतीयाची अपेक्षा आहे. पहलगाम हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नागरिकांना मायदेशात परतण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ते परतले आहेत. आता देशातील काश्मिरी नागरिकांवरही भीतीचे सावट निर्माण झाल्याचे चित्र आहे.

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातून आता एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. नाशिकमधील काश्मिरी नागरिक अचानकपणे गायब झाल्याचे चित्र समोर आले आहे. काही दिवसांपर्यंत धार्मिक स्थळांजवळ, रस्त्यांवर फुले, खेळणी, शाली विक्री करणारे काश्मिरी नागरिक सहजपणे आढळून येत होते. मात्र, आता शहरात काश्मिरी नागरिक दिसेनासे झाले आहेत. हे सारे अचानक कुठे गायब झाले हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Kashmiri citizens leave Nashik,
Maharashtra Samruddhi Mahamarg : उद्घाटन PM करणार की CM ? राजकीय गोंधळामुळे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर

पहलगाम हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर काश्मिरी नागरिकांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाऊ लागल्याची भावना आहे. नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर ओढावू शकते, आपण नागरिकांच्या रोषाचे शिकार होऊ नये, या भीतीने त्यांनी शहर सोडले असावे असा अंदाज स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान अनेक काश्मिरी नागरिकांकडे ओळखीची पूर्ण कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी तपासणी केल्यास काय होईल? या भीतीने त्यांनी शहर सोडलं असावं. शिवाय, सोशल मीडियावर काही ठराविक समाजाकडून खरेदी न करण्याचे संदेश फिरत असल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. यामुळे बेरोजगारी वाढण्याच्या भीतीनेही त्यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला असावा. दरम्यान, या घटनेमुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असले, तरी पोलिस आणि प्रशासनाकडून सर्वतोपरी दक्षता घेतली जात आहे.

Kashmiri citizens leave Nashik,
Ajit Pawar Politics : शरद पवारांना धक्क्यावर धक्के ; दोन माजी मंत्री, तीन आमदारांपाठोपाठ अजित पवारांनी जिल्हाध्यक्षही लावला गळाला

दरम्यान या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिस अॅक्शन मोडवर आली आहे. संशयास्पद हालचालींवर पोलीस नजर ठेऊन आहेत. भाड्याच्या घरांची तपासणी, हॉटेल आणि लॉजमध्ये राहणाऱ्यांची नोंदणी काटेकोरपणे केली जाते. संशयास्पद हालचाली दिसल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com