Sharad Pawar : काकांना पुतण्याच्या हातचा सत्कारही नकोसा... शरद पवारांनी अजितदादांच्या सोहळ्याला जाणं टाळलं !

Ajit Pawar's faction to felicitate former CMs, Sharad Pawar likely to skip event : अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून सत्कार स्विकारण्यास शरद पवारांनी नकार दिल्याचे वृत्त आहे. महायुतीतील पक्षाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याने आम्ही तिथं जाण्याचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनाही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे.

मात्र, शरद पवार यांनी या सन्मान सोहळ्याला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून सत्कार स्विकारण्यास शरद पवारांनी नकार दिल्याचे वृत्त आहे. महायुतीतील पक्षाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याने आम्ही तिथं जाण्याचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Nashik News : पहलगाम हल्ल्यानंतर भीतीचे सावट, नाशिकमधील काश्मिरी नागरिक झाले गायब

शरद पवारांनी यासंदर्भात एका खासगी मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, संबधित कार्यक्रम हा महायुतीशी संबधित पक्षाचा आहे. त्यामुळे महायुतीच्या व्यासपीठावर जाण्याचा संबंध येत नाही. महायुतीशी गाठ नको म्हणून शरद पवारांनी एकप्रकारे या सत्कार सोहळ्याकडे पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आले आहे.

या सत्कार सोहळ्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मुख्यमंत्री नारायण राणे, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. महायुतीचे सर्वच माजी उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना देखील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत निमंत्रण दिलं आहे. मात्र शरद पवार यांनीच या सोहळ्याकडे पाठ फिरवल्याने महाविकास आघाडीमधील माजी उपमुख्यमंत्री या सत्कार सोहळ्याला जाण्याची शक्यता कमी आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Maharashtra Samruddhi Mahamarg : उद्घाटन PM करणार की CM ? राजकीय गोंधळामुळे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज चव्हाण यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे कळवले आहे. उद्धव ठाकरे परदेशात असल्याने ते तर या सोहळ्याला उपस्थित राहू शकत नाही. तर सुशीलकुमार शिंदे यांनी अद्याप निर्णय कळवलेला नाही. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून या माजी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरी जावून सन्मानित करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com