येवला: जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळच राहतील. (Chhagan Bhujbal will continue as Guardian Minister) त्यांचा व शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचा वाद (Dispute with Shivsena`s Suhas Kande) किरकोळ आहे. हा जिल्ह्यातील स्थानिक विषय आहे. (That is a local issue) ते एकत्र बसून तो नक्की सोडवतील. गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांसमोर (Resolve infront of CM Uddhav Thakre) या वादावर मार्ग निघेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP leader Jayant Patil) यांनी केले.
राष्ट्रवादीच्या ‘परिवार संवाद यात्रे’निमित्त येवला येथे आले असताना श्री. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते म्हणाले, की श्री. भुजबळ हे जिल्ह्याचे पालकमंत्री असून, आम्हाला हस्तक्षेपाची गरज वाटत नाही. त्यांना नेहमीच पक्षाचा पाठिंबा राहिला आहे, आजही आहे. हा महाआघाडीतील अंतर्गत विषय असल्याने चर्चा करून न सुटल्यास मुख्यमंत्र्यांसमोर मार्ग काढला जाईल. या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉनच्या फोनची चर्चा झाली; पण भुजबळांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. ते अशा मार्गाला जाणार नाहीत. हा विषय गंभीर आणि अडचणीचा अजिबात नसून, दोघे बसून यातून मार्ग काढतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंचनाम्याद्वारे सविस्तर माहिती
राज्यात पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. या नुकसानीला सरसकट मदत देण्यात तांत्रिक अडचणी आहेत. कोणत्या शेतकऱ्याने कोणते पीक, किती क्षेत्रात घेतले, त्याचे नुकसान कसे झाले, याचा तपशील मिळवूनच मदत देता येणार आहे. ही सरसकट नव्हे, तर व्यक्तिगत स्वरूपाची मदत असल्याने नुकसानीची सविस्तर माहिती पंचनामे करून जमा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वबळ नव्हे, एकत्रितला प्राधान्य
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील भूमिकेविषयी विचारले असता, महाविकास आघाडीतील घटकांसोबत एकत्र लढण्याला आमचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जे बरोबर येतील त्यांना सोबत घेतले जाईल, स्थानिक पातळीवरचे राजकारण पाहून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचे प्रश्न, संघटनेचे काम पाहण्यासाठीच मी हा दौरा सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.