Sharad Pawar, Chhagan Bhujbal & Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

OBC Issue : `इंडीया`च्या भूमिकेने छगन भुजबळांची राजकीय कोंडी?

`ओबीसी` च्या प्रश्नावर `इंडीया` तर भाजप प्रतिकूल असल्याने समर्थकांचा वैचारीक गोंधळ होण्याची शक्यता

Sampat Devgire

OBC Issue News : राष्ट्रीय राजकारणात काल दोन मोठ्या घडामोडी झाल्या. त्यात भुजबळांनी समर्थन केलेल्या अजित पवार गटाने `एनडीए`ला पाठींबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा वैचारीक बांधीलकीनुसार `इंडीया` आघाडीत सहभागी झाले. `एनडीए`ची ओबीसी विषयावर भूमिकाच नाही, तर `इंडीया` आघाडीने जातनिहाय जनगनणेची घोषणा केली आहे. त्यामुळे भुजबळ समर्थकांची वैचारीक व राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. (There will may be ideological confusion on the cast-wise census)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे काल भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील `एनडीए`च्या बैठकीत सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) काँग्रेस (Congress) नेतृत्वाखालील `इंडीया`च्या बैठकीला उपस्थित राहीले.

काँग्रेस नेतृत्वाखालील `इंडीया`ने जाहीर केलेल्या धोरणात जातनिहाय जनगनणा करण्याची भूमिका जाहीर केली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यावर राज्यातील भाजप सरकारला पाठींबा देताना आपण `ओबीसी` घटकांच्या हितासाठी शरद पवार गटातून बाहेर पडत असल्याचे सांगितले होते.

`ओबीसी` या विषयावर भाजपचे नेते खूप चांगले काम करीत आहेत. अनुकूल भूमिका घेतात. त्यांनी आम्हाला मदत केली होती, असा दावा देखील त्यांनी केला होता. मात्र मंगळवारी देशात दोन मोठ्या घटना घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी नवी दिल्लीत भाजपच्या नेतृत्वाखालील `एनडीए`च्या बैठकीत भाग घेतला. त्यांनी भाजपला पाठींबा देत असल्याचे जाहीर केले आहे.

याचवेळी बंगलूरू शहरात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सव्वीस पक्षांची बैठक झाली. त्यांच्या प्रमुख घोषणेत जातनिहाय जनगनणा हा विषय आहे. याच विषयावर मंत्री छगन भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून आंदोलन केले जात होते. मात्र भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने प्रतिकूल भूमिका घेतल्याचा आरोप केला जातो. सर्वोच्च न्यायालयात याबाबत इम्पीरीकल डाटा सादर करण्यास नकार दिला होता.

राष्ट्रीय स्तरावरील या दोन्ही आघाड्यांच्या राजकीय व वैचारीक भूमिकेत मोठे अंतर आहेत. त्यात `एनडीए`ओबीसी विषयावर ठोस उपाय व भूमिका याबाबत प्रतिकूल असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो.

अशा स्थितीत भाजप विरोधकांनी थेट जातनिहाय जनगनणा विषयावर जाहीर भूमिका घेतल्याने कोणाबरोबर जावे यावरून भुजबळ समर्थकांचा गोंधळ होऊ शकतो. यात मंत्री भुजबळ यांची राजकीय कोंडी होऊ शकते अशी चर्चा राजकीय तज्ञांकडून व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT